आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट:अमेरिकेत भारतीयांविरुद्ध वाढला “हेट क्राइम’, 4533 प्रकरणांची या वर्षी नोंद, 9/11 नंतर वाढला हिंसाचार

न्यूयॉर्क / मोहंमद अलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय आणि द. आशियाई वंशाचे नागरिक अमेरिकेत सर्वात प्रभावी स्थलांतरित समूह आहे. याच कारणामुळे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनात दोन डझनहून जास्त द. आशियाईचे लोक आहेत. असे असतानाही या समुदायाच्या लोकांविरुद्ध द्वेषभावनेच्या गुन्ह्यांची प्रकरणे थांबत नाहीत. भारतीय वंशाचे हिमांशू कश्यप गेल्या महिन्यात अरकन्सासला जाताना अशाच वर्णद्वेषाचे बळी ठरले. न्यूयॉर्क शहराचे रहिवासी कश्यप म्हणाले, रिपब्लिकन राज्यांत निर्वासितांविरोधात जास्त द्वेष आहे. श्वेत वर्चस्वाद्यांना वाटते की,त्यांच्या नोकऱ्या भारतीय हिरावून घेत आहेत.

९/११ व्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त हेट क्राइमची चर्चा होत आहे. एफबीआयच्या युनिफॉर्म क्राइम रिपोर्ट्‌समध्ये आशियाई समुदायाविरुद्ध हेट क्राइमचे ३२४ प्रकरणे नोंदली आहेत. दुसरीकडे, स्टॉप हेट अगेस्ट एशियन अमेरिकन्स कँपेन पोर्टलवर मार्च २०२० ते जून २०२१ दरम्यान हेट क्राइमचे ९,०८१ खटले नोंदले. यात ४,५४८ हे २०२० आणि ४,५३३ गुन्हे या वर्षी नोंदले आहेत.

खूप सारे लोक तक्रार दाखल करत नाहीत :
९/११ नंतर बलबीर सोढी पहिले शीख होते, जे हेट क्राइमचे बळी ठरले होते. गुरुवारी अनेक सिनेटर्सनी सोढींना श्रद्धांजली अर्पण केली. सिनेटर शेरोड ब्राऊन म्हणाले, २० वर्षांपूर्वी एका शिखाची हत्या झाली होती. आपणास हेट क्राइमविरुद्ध उभे राहिले पाहिजे. उ. अमेरिका पंजाबी असोसिएशनचे संचालक सतनाम चहल म्हणाले, अनेक पीडित अडचण टाळण्यासाठी तक्रार देण्यास धजावत नाहीत.

सर्वात जास्त प्रकरणे तोंडी शेरेबाजीची
हेट क्राइमच्या सर्वात प्रकरणात तोंडी शेरेबाजीची (६३.७%) आहेत. १६.५% प्रकरणे आशियाई वंशाच्या लोकांविरुद्ध दुर्लक्ष करणे, १३.७% गुन्हे शारीरिक हल्ल्याची आहेत.

- शारीरिक हल्ल्यासोबत ऑनलाइन हिंसाही वाढली
गुन्हे 2020 2021
विध्वंस 2.6% 4.9%
ऑनलाइन घृणा 6.1% 10.6%
रस्त्यावरील घटना 26.7% 36.6%
घरात हिंसाचार 8.9% 10.0%
ज्येष्ठांविरुद्ध 6.5% 7.2%
तोंडी शेरेबाजी 69.5% 20.6%
शारीरिक हल्ला 10.8% 16.6%

सरकारचा दावा- असे गुन्हे रोखण्यास प्राधान्य : अमेरिकेचे अॅटर्नी जनरल मेरिक गारलँड म्हणाले, हेट क्राइमसारख्या घटना रोखणे आणि त्यांना उत्तर देणे विधी विभागाचा प्राधान्यक्रम आहे. हे आकडे विविध समुदाय आणि विधी संस्थांद्वारे आम्ही जाणून घेतो.

बातम्या आणखी आहेत...