आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन:लाॅकडाऊनला विरोध करणाऱ्यांना भिडणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्याला ज्यूंबद्दल द्वेष; सिरियातील बंडखोरांच्या संपर्कात

लंडन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या स्कॉटलंड यार्डला त्यांच्या एका महिला पोलिस अधिकाऱ्यामुळे प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. तिचे नाव रुबी बेगम आहे. तिचे सिरियाचे जिहादी महिलांसोबतच्या संबंधांचा खुलासा झाला आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनविरोधात झालेल्या आंदोलनात आंदोलकांशी रुबी थेट भिडली होती. तिच्या या साहसाचे सर्वत्र कौतुक झाले होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तिला नव्या पिढीसाठी प्रेरणा म्हणत सन्मानित केले होते. आता जिहादी संबंध स्पष्ट झाल्याने बेगमला दिवटीवरून हटवण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

२६ वर्षांची रुबी सार्वजनिक व्यवस्थेची टास्कफोर्स सदस्य आहे. २०१२ पासून ती रुबी बीज नावाने ट्विटरवर सक्रिय असून कुकी नावाने २५ हजारांपेक्षा जास्त पोस्ट केल्याचे सांगण्यात येते. तिच्या ज्यूंबाबत द्वेष असलेल्या पोस्टचा शोध इंग्रजी वृत्तपत्र मेल ऑनलाइनने लावला. रुबीला सुगावा लागताच तिने अकाउंट बंद केले. वृत्तपत्रानुसार पोस्टमध्ये ती नेहमीच ‘कफर’ आणि पाकिस्तानींसाठी कोड नाव ‘पीएस’ वापरायची. तिने २०१४ मध्ये बहुतांशी ज्यूविरोधी टिप्पण्या केल्या होत्या. तेव्हा इस्रायलने गाझापट्टीत अतिरेकी गट हमासवर हल्ला केला होता. हल्ल्यात २ हजार जण ठार झाले होते. रुबीने तेव्हा ज्यूंना गुंडा म्हटले होते. तिने म्हटले, त्यांच्यात ममता नाही. कठोर शिक्षा होईपर्यंत मी प्रतीक्षा करू शकत नाही. त्यांनी जसे केले तसेच त्यांचेही होईल.

संशयित जिहादी मुस्लिमा फॉर लाइफ लिंकच्या संपर्कात होती रुबी
रुबी सिरियात अतिरेकी संघटना आयएसशी संबंधित महिला जेहादींच्या संपर्कात असल्याचा खुलासा झाला आहे. ती संशयित ऑनलाइन मुस्लिमा फॉर लाइफ नावाचा वापर करते. अमेरिकेत २००१ मध्ये झालेल्या ९/११ हल्ल्याच्या स्मृतिदिनी २०१४ मध्ये लिहिले होते, जर मी ९/११ करिता २ मिनिटे मौन पाळले तर मला मूर्ख म्हणतील.

बातम्या आणखी आहेत...