आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

योग्यशक्ती:कोरोनाला हरवण्यासाठी हठयोग, लडाखपासून रामेश्वरमपर्यंत.....

नवी दिल्ली /ब्रुसेल्स / काबूलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जगावरील कोरोना संकट काळातच रविवारी सहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. लडाखच्या खारदुंग ला येथे १८ हजार फूट उंचीवर तर उत्तराखंडच्या बद्रिनाथजवळील वसुधारा हिमनदी परिसरात १४ हजार फूट उंचीवर आयटीबीपीच्या जवानांनी योग केला. श्रीनगरपासून रामेश्वरमपर्यंत देशभरात अनेक ठिकाणी कोरोनामुळे फिजिकल डिस्टन्सिंग राखून योग करण्यात आला. परदेशात सर्वात आधी याचे न्यूझीलंडमध्ये आयोजन करण्यात आले होते. त्याशिवाय अमेरिका, ब्रिटन, बेल्जियम, तुर्की, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, चीनमध्येही लोकांनी मास्क घालून कार्यक्रमात सहभाग घेतला होता. कोरोनामुळे लोक मोठ्या संख्येने यंदा डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहभागी झाले होते.

वेलिंग्टन । न्यूझीलंडची प्रमुख शहरे क्राइस्टचर्च, वेलिंग्टन, ऑकलंडमध्येही योग कार्यक्रम झाले.

काबूल । अफगाणिस्तानच्या राजधानीत पर्वत शिखरावर महिलांनी डिस्टेन्सिंगसह योगासने केली.

ब्रुसेल्स । बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्सच्या ऑटोमियम इमारतीसह अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले.

बातम्या आणखी आहेत...