आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या हवाईत सोमवारी एक विमान एअर टर्ब्युलन्समध्ये अडकले. ही घटना हवाईयन एरलाइन्सचे HA35 विमान फीनिक्सहून होनोलुलुला जाताना घडली. त्यात 278 पैकी 36 प्रवाशी जखमी झाले. तर 11 प्रवाशांची स्थिती गंभीर आहे.
जखमींत 14 महिन्यांच्या एका बाळाचाही समावेश आहे. हवाईयन एअरलाइन्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 13 प्रवाशांसह 3 क्रू मेम्बर्सना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विमान उतरण्यापूर्वी विमानतळावर सुरक्षा व्यवस्था
विमानाने सकाळी 10:50 वा. होनोलूलूमध्ये सुरक्षित लँडिंग केली. हवाईयन एअरचे कार्यकारी उपाध्यक्षांनी सांगितले की, स्थितीचा आढावा घेऊन विमान उतरण्यापूर्वी विमानतळाच्या गेट 10Aवर अग्निशमन दलाच्या गाड्या, पॅरामेडिक्स व राज्य विमान बचाव अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते.
विमानाच्या छताला धडकले प्रवाशी
विमानात प्रवास करणारे प्रवाशी कायली रेयेस यांनी सांगितले की, विमान उतरण्यासाठी अवघ्या 30 मिनिटांचा अवधी शिल्लक असताना अचानक अफरातफरी माजली. माझी आई माझ्या बाजूला बसली होती. पण तिला स्वतःचा सीटबेल्ट बांधण्याचीही संधी मिळाली नाही. यामुळे ती वरच्या दिशेला उसळून विमानाच्या छताला जावून धडकली.
सीटबेल्ट घालण्यापूर्वी दुर्घटना
यासंबंधीच्या वृत्तानुसार, अमेरिकेत सीटबेल्ट न घातल्यामुळे दरवर्षी जवळपास 58 जण जखमी होतात. 1980 ते 2008 पर्यंत अमेरिकन विमानात टर्ब्युलन्सच्या 134 घटना घडल्या. त्यात 298 जण जखमी झाले. तसेच काहींचा मृत्यूही झाला.
2019 मध्ये न्यूयॉर्कच्या केनेडीतही अशीच एक घटना घडली होती. त्यात 30 जण गंभीर जखमी झाले होते. 2015 ध्ये एअर कॅनडाच्या विमानात घडलेल्या अशाच एका घटनेत 21 प्रवाशी जखमी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.