आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:फास्ट फूडच्या रॅपर्समधील घातक रसायनामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची शक्यता

वॉशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रॅपर्सच्या मुद्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या शाईत घातक रसायन

जगभरात कोविडच्या काळात पॅकेजिंग फूडची मागणी वेगाने वाढली. पॅक्ड फूडसाठी वापरल्या जाणाऱ्या रॅपर्समध्ये हानिकारक कॅन्सर निर्माण करणारे केमिकल असते, असा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. यूएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन सेल एक्सपोझरने रॅपरमध्ये पॉलिफ्लोरिकल सबस्टेन्स (पीएफएएस) असल्याचे म्हटले आहे. हे केमिकल विघटित होत नाही. ते रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करते.

पचनासाठीदेखील सहज नाही. त्यातून पर्यावरणाचे नुकसान होते. हे केमिकल रॅपर्सच्या लोगो, इशाऱ्यासह इतर निर्देश देण्यासाठी मुद्रित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये असते. अलीकडच्या एका अभ्यासानुसार कोरोनाची लस रोगप्रतिकारक्षमता वाढवत असली तरी हे केमिकल त्यालाही कमकुवत करू शकते. न्यूयॉर्क, न्यूजर्सी, कनेक्टिकटसह शहरातील फास्ट फूड शॉप व रेस्तराँमध्ये २४ कंपन्यांमध्ये तयार होणाऱ्या ११८ फूड पॅकिंग उत्पादनांचे नमुने गोळा करण्यात आले होते.

प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी ते पाठवण्यात आले होते. त्याच्या अहवालात कंपनी ६१८ ते ८७६ पार्टवर पीपीएएसच्या रॅपरचा वापर करत आहे. ते अतिशय हानिकारक आहे. त्यामुळेच फूड प्रॉडक्टमध्ये डेली बेकरी पेपरच्या वापरावर बंदी आणण्यासाठी टॉक्सिक फ्री भविष्याच्या नावाने अभियान चालवण्यात आले. अशा प्रकारच्या रॅपरचा वापर ३० ते ६० टक्क्यापर्यंत कमी करण्याचेही प्रयत्न सुरू झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...