आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारत आणि चीनच्या लद्दाख सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये काही संशयास्पद हालचाली होत असल्याचे वृत्त आहे. मंगळवारी आर्मी चीफ कमर जावेद बाजवा हे सर्व उच्च अधिकाऱ्यांसह गुप्तचर संस्था आयएसआयच्या मुख्यालयात पोचले. त्यांनी काश्मीर आणि नियंत्रण रेषेवरील हालचालींचा आढावा घेतला. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार बाजवा यांचे आयएसआय मुख्यालयात भेट देणे हे सामान्य नसून धक्कादायक आहे. सहसा लष्कर प्रमुख गुप्तचर यंत्रणेच्या कार्यालयाला भेट देत नाहीत. तसेच लष्करासोबत ते कधीच भेटी देत नाही. आयएसआय हेच सैन्याच्या मुख्यालयात लष्करप्रमुखांना माहिती देत असते. मात्र या भेटी धक्कादायक आहेत.
मंगळवारी लद्दाखमध्ये भारत-चीन सैन्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत भारताचे 20 सैनिक शहीद झाले. न्यूज एजेंसीनुसार, चीनचेही प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांचे 43 सैनिक मारले गेल्याचे किंवा जखमी झाल्याची शक्यता आहे.
बाजवा यांच्यासोबत अजून कोण होते?
रेडियो पाकिस्ताननुसार, आयएसआय हेडक्वॉर्टरमध्ये ही महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये बाजवासोबतच जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ नदीम रजा, नेव्ही चीफ एडमिरल जफर महमूद अब्बासी आणि एअरफोर्स चीफ मुजाहिद अनवर खान यांची उपस्थिती होती. आयएसआय चीफ लेफ्टिनेंट जनरल फैज हामिद यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर दिर्घकाळ यांची बैठक सुरू होती.
आयएसआय मुख्यालयात सैन्य प्रमुख असणे हे सामान्य नाही
सैन्य दल, हवाई दल आणि नेव्हीदलाच्या प्रमुखांनी एकत्र आयएसआय मुख्यालयाला भेट देणे हे सामान्य नसल्याचे न्यूयॉर्क टाईम्सच्या पाकिस्तान ब्युरोचे प्रमुख सलमान मसूद यांचे मत आहे. ट्विटरवर सभेचा फोटो शेअर करताना मसूद यांनी या घटनेला एक असामान्य आणि धक्कादायक घटना म्हटले आहे. रेडिओ पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार या बैठकीत प्रादेशिक सुरक्षा, नियंत्रण रेषेवरील परिस्थिती आणि काश्मीर यावर दीर्घ चर्चा झाली. बाजवा यांनी आयएसआयच्या कामाचे कौतुक केले.
https://twitter.com/salmanmasood/status/1272951716556800006?s=20
बालाकोटनंतरही असे घडले नाही
सलमान मसूदने लिहिले की, 2008 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव होता. यानंतर बालाकोट येथील हल्ला झाला. त्यानंतरही तिन्ही सैन्य प्रमुख आयएसआय मुख्यालयात गेले नाहीत. सैन्याच्या मुख्यालयात अशा बैठका नेहमी घेतल्या जातात. पण, मंगळवारची बैठक ही आश्चर्यकारक आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.