आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Health Data Updates: If You Are Not Getting Enough Sleep Due To Epidemics And Stress; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:महामारी व तणावामुळे पुरेशी झोप घेत नसाल तर ब्लड शुगर आणि चरबी वाढण्याचा धोका, दररोज 7 तास झोप घेणे हेच चांगले

लंडन16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कमी झोपत असाल आणि चॉकलेट-बिस्कीट खाण्याची इच्छा होत असेल तर सावध व्हा...

गेल्या वर्षभरात महामारी आणि तणावामुळे अनेकांची झोप उडाली आहे. झोप न झाल्यास मूड, स्मरणशक्ती व एकाग्रतेवर परिणाम होतो. कमी झोपेमुळे लठ्ठपणा वाढून ब्लड शुगरच्या पातळीवरही दुष्परिणाम होतो. वैद्यकीय तज्ज्ञांनुसार, तणाव आणि निद्रानाशामुळे शरीरात हार्मोन्सचा समतोल बिघडतो. यामुळे रक्तशर्करा व कंबरेजवळ अतिरिक्त चरबी साठण्याची शक्यता वाढले. तणावामुळे चॉकलेट, बिस्कीटसारख्या फॅट्स व गोड पदार्थ (जास्त कॅलरी असलेले) खाण्याची तीव्र इच्छा होते. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे डॉ. मायकेल मोस्ले यांच्यानुसार ब्रिटन आणि अमेरिकाच नव्हे, तर जगभरातील देशांत लॉकडाऊनमुळे लोकांचे वजन खूप वाढले आहे.

ब्रिटनमध्ये तर १.४ कोटी लोक प्री-डायबिटीसच्या (ब्लड शुगर खूप वाढणे) स्थितीत आहेत. डॉ. मोस्लेंनुसार, कंबरेचा घेर वेगाने वाढत आहे. तुम्ही २० वर्षांचे असताना असलेेल्या कंबरेच्या तुलनेत आता घेर वाढला असेल तर तुम्ही मधुमेहाच्या रिस्क झोनमध्ये आहात. लीड्स विद्यापीठात मेडिसिनच्या प्रो. इलेनॉर स्कॉट यांच्यानुसार, सात तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या लोकांत लठ्ठपणा आणि मधुमेहाचा जास्त धोका असतो. अपुऱ्या झोपेमुळे भुकेशी संबंधित हार्मोनमध्ये बदल होतो. यामुळे पोट नेहमीच रिकामे असल्याचे वाटते. तसेच त्यामुळे गोडधोड खाण्याची अतीव इच्छा होते.

किंग्ज कॉलेज लंडनच्या ताज्या अभ्यासात दावा केला आहे की, निद्रानाशामुळे त्रस्त लोक रोज सरासरी ३८५ कॅलरी (केकच्या मोठ्या तुकड्याइतके) जास्त खातात. थकल्यानंतर भुकेशी संबंधित हार्मोन तसेच त्याच्याशी निगडित मंेदूतील भागही सक्रिय होतात. सोप्या शब्दांत... चिप्स, चॉकलेटसारख्या पदार्थांबाबत जे लोक जास्त आकर्षित होतात त्यांच्यात ही अतिरिक्त चरबी पोटाजवळ साठू लागते. यामुळे रक्तदाब व कोलेस्टेरॉल वाढू शकतो. परिणामी हृदयविकार तसेच पक्षाघातही होऊ शकतो.

कमी झोप व तणावामुळे वजन आणि कंबरेचा घेर वाढण्याची जोखीम जास्त
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार, तणाव व कमी झोपेमुळे वजन आणि कंबरेचा घेर आटोक्यात आणण्यात जास्त अडचण येते. त्याचे कारण फक्त मानसशास्त्रीय दबाव नाही. कॉर्टिसोलही (तणावाशी संबंधित हार्मोन) शुगरची पातळी वाढवू शकते. वाढीव कार्टिसोल स्नायू व उतींना इन्शुलिन प्रतिरोध निर्माण करतो. (म्हणजे त्या इन्शुलिनला त्याचे काम करू देत नाही) तसेच ते यकृतालाही रक्तात जास्त शुगर सोडण्यासाठी उत्तेजित करते. डॉ. मोस्ले यांच्या मतानुसार, हे सर्व टाळण्याचा सर्वात रामबाण उपाय म्हणजे पुरेशी झोप घ्यावी आणि तणावमुक्त राहावे.

बातम्या आणखी आहेत...