आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
न्यूझीलंडचे आराेग्यमंत्री डेव्हिड क्लार्क यांनी काेराेनावर आपल्याच वक्तव्याबद्दल गुरुवारी पदाचा राजीनामा दिला. क्लार्क यांनी लाॅकडाऊनचा नियम माेडल्याबद्दल स्वत:लाच मूर्ख म्हटले हाेते. एवढेच नव्हे तर त्यांनी देशात परतलेल्या लाेकांना विनाचाचणी प्रवेश दिल्याबद्दल आराेग्य महासंचालक अॅश्ले ब्लूमफील्ड यांना जबाबदार ठरवले हाेते. त्यावर जनतेने टीका केली हाेती. क्लार्क बाेलत हाेते. तेव्हा ब्लूमफील्ड त्यांच्या मागे उभे हाेते. ब्लूमफील्ड या टीकेमुळे हैराण झाले. तिकडे गांगरून इकडे-तिकडे पाहत हाेते.
यासंबंधीच्या व्हिडिआेला लाखाे लाेकांनी पाहिले. ब्लूमफील्ड देशातील विश्वसनीय चिकित्सा तज्ञ आहेत. दरम्यान, राजीनाम्याची घाेषणा करताना क्लार्क म्हणाले, मी पूर्ण प्रामाणिकपणे काम केले. परंतु या पदावर असल्यामुळे काेराेनाचे उच्चाटन करण्यात सरकारला अडचण येत असावी, असे मला वाटू लागले आहे. एप्रिलमध्ये लाॅकडाऊन लागू असतानाही क्लार्क सहकुटुंब १९ किमींच्या समुद्र सफारीवर गेले हाेते. टीकेनंतर त्यांनी स्वत:ला मी मूर्ख आहे. लाेक माझ्यावर नाराजी हाेतील.
इस्रायल : रुग्णांचा शाेधासाठी फाेन ट्रॅक
येरुशेलम । इस्रायल संसदेने काेराेना रुग्णांचा शाेध घेण्यासाठी देशातील अंतर्गत सुरक्षा संस्था शिन बेटला फाेन ट्रॅक करण्याचा अधिकार दिला आहे. देशात काेराेनाच्या दुसऱ्या लाटेची भीती लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. इस्रायलच्या संसदेत याच्या बाजूने ५१, तर िवराेधात ३८ मते पडली. फाेन ट्रॅक करून बाधित व्यक्तीच्या संपर्कातील लाेकांची दाेन आठवड्यांत आेळख पटवता येणार आहे. अशा लाेकांना दाेन आठवडे क्वाॅरंटाइन केले जाईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.