आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोपची स्थिती वाईट:आरोग्य संघटना; फ्रान्समध्ये एका मिनिटात एक, दोन मिनिटांत ब्रिटनमध्ये दोघांचा मृत्यू

पॅरिस/लंडन/माद्रिद3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • स्पेनमध्ये मृत्यूंत वाढ, कब्रस्तानमध्ये दर १५ मिनिटास एक पार्थिव येतेय

फ्रान्समध्ये गेल्या २४ तासांत १४०० जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. ब्रिटनमध्ये २४ तासांत ७८६ जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच फ्रान्समध्ये एक मिनिटात एक तर ब्रिटनमध्ये दोन मिनिटांत एका व्यक्तीचा मृत्यू काेरोनामुळे झाला. फ्रान्समध्ये मृतांची संख्या १० हजाराहून जास्त झाली आहे. देशात कोरोनामुळे रुग्णालयांत ७ हजार ९१ जणांचा तर वृद्धाश्रमांत ३ हजार २३७ जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे युरोपातील स्थिती आणखी चिंताजनक बनली आहे, असे बुधवारी जागतिक आराेग्य संघटनेने स्पष्ट केले. नेदरलँडमध्ये बुधवारी सुमारे १ हजार नवीन रुग्ण समोर आले. त्यानंतर आकडा २० हजारांच्या पुढे गेला. ब्रिटनमध्ये सैनिकांना अग्निशमन सेवेत मदत करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. परिचारिका कमी असल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. सर्वाधिक संसर्ग झालेल्या पाच देशांत फ्रान्सचा समावेश आहे. फ्रान्समध्ये एक लाखाहून जास्त लोक बाधीत झाले आहेत. देशात सुमारे ७ हरजारा लोकांची स्थिती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. 

स्पेनमध्ये मृत्यूंत वाढ, कब्रस्तानमध्ये दर १५ मिनिटास एक पार्थिव येतेय

स्पेनमध्ये कोरोनामुळे दररोजचा मृतांचा आकडा मंगळवारी ७४३ वर पोहोचला. मृतांची एकूण संख्या १४ हजाराहून जास्त झाली आहे. सर्वत्र मृतदेह दिसू लागले आहेत. माद्रिदमधील देशातील सर्वात मोठ्या कब्रस्तानमध्ये दर १५ मिनिटांना मृतदेह येत आहे. या अंत्यसंस्कारावेळी ५ पेक्षा जास्त लोकांना सहभागी होण्याचीदेखील परवानगी नाही. विषाणुबाधेची सर्वाधिक झळ पोहोचलेला स्पेन युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. 

बातम्या आणखी आहेत...