आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबई:माजी आयआयटीयनच्या संशोधनातून निर्मित ‘हेकोल कापड’ सर्व प्रकारच्या विषाणूंचा करते नायनाट; डीआरडीओ-इस्रोने केला करार, यूएन-रेल्वेनेही तयार केले मास्क

दुबई / शानीर सिद्दिकीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एखादे कापड ९९% अल्ट्राव्हायोलेट (अतिनील) किरणे रोखू शकेल, ९५% प्रदूषण फिल्टर करण्याव्यतिरिक्त विषाणू व बॅक्टेरिया मारेल, हे शक्य आहे का?... होय, असेच संशोधन आयआयटी मद्रासच्या माजी विद्यार्थिनी व २३ देशांत काम केलेल्या दीप्ती नथाला यांनी केले आहे. त्यांनी ‘हेकोल’ (हेल्दी कव्हर फॉर ऑल) पर्यावरणपूरक कापड विकसित केले असून डीआरडीओ व इस्रोनेही त्यांना उत्पादन करण्यास सांगितले आहे. दुबई एक्सपोत त्याचे कौतुक झाले. या इनोव्हेशनची कहाणी दीप्ती यांच्याच शब्दांत...

‘मध्यपूर्व देश आणि अमेरिकेत १० वर्षे काम केल्यानंतर मी २०१८ मध्ये हैदराबादला परतले. दीर्घ काळ विदेशात राहिल्यानंतर शरीर भारतीय पर्यावरणास अनुकूल राहिले नाही, असे जाणवले. शहरात वाहन चालवताना डोकेदुखी आणि त्वचेच्या समस्या जाणवू लागल्या तेव्हा प्रदूषणापासून बचाव गरजेचा आहे, असे वाटले. संशोधनात आढळले की, महिला जे स्कार्फ बांधतात ते प्रदूषण, विषाणू रोखण्यास उपयुक्त नाहीत. नंतर मी कपड्याला ‘बॉडीगार्ड मॉलिक्यूल’ने जोडण्याची प्रक्रिया जाणून घेतली. नवीन नॅनो तंत्रज्ञान कपड्याशी जोडण्याची माझी इच्छा होती, संशोधनात ८० वेळा अपयश आले, पण हे शक्य आहे, असा विश्वास होता. तसेच झाले. २०१९ मध्ये डिब्बू सोल्युशन्स लाँच केले. आधी उत्पादन स्थानिक स्तरावर विकले. पण महामारीदरम्यान केंद्राच्या जैवतंत्रज्ञान विभागाने फक्त मास्क तयार करण्यावर भर देण्यास सांगितले. आम्हाला भारतीय रेल्वे, युनायटेड नेशन्स, पर्यटन व खाण मंत्रालयाकडूनही ऑर्डर मिळाल्या. डीआरडीओने कारगिलसारख्या उंच ठिकाणी तैनात केल्या जाणाऱ्या सैनिकांसाठी कपडे बनवण्यास सांगितले. त्यांना अतिनील किरणांपासून त्वचेच्या आजाराचा धोका असतो.

हेकोल सामान्य सर्दीसोबतच कोरोना आणि एच1एन1 सारख्या विषाणूंवरही प्रभावी आहे. जर्मनीच्या एच1एन1 व्हायरस इनहिबिशन टेस्टेड अॅट ब्युरो व्हेरिटासने त्याला प्रमाणित केले. एनएबीएल, बीटीआरए आणि नेल्सन लॅब्जनेही ते प्रमाणित केले आहे. आमची उत्पादने विषाणू रोखण्यासोबतच त्यांना नष्टही करतात. नॅनो प्रॉडक्ट कपड्यासोबत एकत्रित केल्याने त्याचे लाइफ ६ हजार वॉशपर्यंत राहते. जगभरात अशी उत्पादने ६० ते १०० वॉशपर्यंतच चालतात. अतिनील किरणे, प्रदूषण व विषाणूवर एकाच वेळी काम करणारे हे जगातील पहिले प्रॉडक्ट आहे. वयाच्या आठव्या वर्षी आईचे निधन झाले होते. त्यामुळे संघर्ष बालपणापासूनच होता. २००७ ते २०१७ पर्यंत मल्टीनॅशनल्ससाठी २३ देशांत काम केले. पण त्यात पॅशन नव्हती. त्यामुळे मायदेशी परतले. पण कुठूनही मदत मिळाली नाही. अलीकडेच दुबईत गुंतवणुकीसाठी प्रयत्न केले. तेलंगण सरकारनेही आमच्या उत्पादनांचे शोकेस केले आहे. कंपनीचे मूल्य १०० कोटी रुपये निर्धारित केले आहे. लवकरच चांगली गुंतवणूक होईल, अशी आशा आहे.’- दीप्ती

siddiqui.shaneer@gmail.com

बातम्या आणखी आहेत...