आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुबईत दरवळ:13 लाख चौ.मी.मध्ये 6 कोटी फुले, मेहनत पाहता यावी यासाठी बागकाम करणाऱ्यांना हेलिकॉप्टरने नेतात

दुबई / शानीर एन. सिद्दिकी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या संपूर्ण दुबईत फुलांचा दरवळ पसरलेला आहे. कुठूनही गेले तरी प्रत्येक ठिकाणी फुले दिसतील. दुबई प्रशासनानुसार, १३ लाख चौरस मीटरमध्ये ५.७ कोटी फुले फुलली आहेत. रस्त्यांवर फुले लावताना मानसशास्त्र लक्षात घेतले जाते. उदाहरणार्थ -जास्त वाहतुकीच्या रस्त्यांवर शांत, सुखद आणि सकारात्मक ऊर्जा देणारी फुले लावली जातात. वाहतुकीमुळे येणारा तणाव कमी व्हावा हा त्यामागील हेतू आहे. बागकाम करणाऱ्यांची पथके या बागांची निगा राखतात. आपण केलेली मेहनत पाहता यावी यासाठी अनेक बागकाम करणाऱ्यांना हेलिकॉप्टरद्वारे शहर दाखवले जाते.

१९७१ पासून ही परंपरा सुरू आहे
१९७१ मध्ये दुबई देश म्हणून अस्तित्वात आला. तेव्हा देशात हिरवळ निर्माण करण्याचे शेख झायेद व शेख राशिद यांनी निश्चित केले. तेव्हापासून हा प्रयत्न सुरू आहे. तथापि, त्यावरील खर्चाचा तपशील महापालिका जारी करत नाही.

बातम्या आणखी आहेत...