आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जपान सरकारचे सहा सदस्यीय पॅनल जपानचा आगामी ‘सम्राट’ ठरवण्यासाठी चर्चेत गुंतलेले आहेत. परंतु या प्रश्नाचे उत्तर शाेधण्यासाठी दीर्घकाळापासून देशात समित्या स्थापन झाल्या. परंतु समितीमधून काहीही निष्पन्न झालेले दिसत नाही. वास्तविक ६१ वर्षीय नाराेहिताे राजसत्तेचे सम्राट आहेत. त्यांच्यासमवेत राजकुमारी आयकाेही आहे. परंतु जपानच्या विद्यमान कायद्यानुसार महिलांना राजगादी मिळत नाही. म्हणूनच आयकाे राजघराण्याच्या वारसदार नाहीत. जपानच्या शाही परिवारात एकूण १८ सदस्य आहेत. त्यापैकी केवळ ७ सदस्य ३० किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत. त्यामुळेच आता हा ताज नाराेहिताे यांचे धाकटे भाऊ १४ वर्षीय हिसाहिताेला मिळू शकताे. भविष्यात त्यांना मुलगा झाला नाहीतर २६०० वर्षांहून जास्त परंपरा असलेल्या शाही घराण्याला वारसा राहणार नाही. महिलांना जपानचे शासक हाेता येणार नाही, असा नियम १९४७ मध्ये तयार करण्यात आला हाेता. त्याआधी १७६२-१७७१ दरम्यान साकुरामची महाराणी हाेत्या.
फुकुई प्रीफेक्चुरल विद्यापीठात सामाजिक विषयातील रुढीवादी याेईच शिमदा म्हणाले, समिती नावालाच आहे. कारण शाही परिवारासाठी पूर्वीही अनेक समित्यांची स्थापना झाली. ते चांगल्या गाेष्टी सांगतात. परंतु आतापर्यंत अशी समित्यांच्या काेणत्याही चांगल्या शिफारशींसाठी सर्वसंमती झालेली नाही. महिलांना गादी देण्याच्या ते कट्टर विराेधक आहेत. असे काही करण्यापेक्षा शाही परिवाराने लांबच्या नातेवाइकांचा शाेध घेतला पाहिजे. त्यात दुसऱ्या महायुद्धात शाही उपाधी नाकारणाऱ्या अनेक नातेवाइकांचाही समावेश आहे. त्यांना पुन्हा शाही परिवाराशी जाेडले पाहिजे. त्यातून भविष्यातील सम्राटाची निवड करण्यासाठी याेग्य पुरुष मिळू शकतील, असे ते सुचवतात. असाच एक प्रस्ताव सत्ताधारी एलडीपी पक्षाच्या खासदारांनी देखील मांडला. टेम्पल युनिव्हर्सिटीचे टाेकियाे कॅम्पसमधील राजशास्त्राच्या प्राेफेसर हिराेमी मुराकामी म्हणाल्या, महिलांना राजेशाहीची सूत्रे देण्याच्या विचाराने रुढीवादी एवढे नाराज का हाेतात, हेच कळत नाही. इम्पिरियल हाऊल लाॅने महिलांना गादी देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली पाहिजे. देशात एक जनमताचा काैल घेण्यात आला हाेता. त्यात सामान्य जनतेपैकी ७० ते ८० लाेकांनी उत्तराधिकारी संबंधी नियमांत बदल करण्याचे समर्थन केले हाेते. ८५ टक्के लाेक महिलांना सिंहासनवर बसल्याचे पाहू इच्छितात. परंतु परंपरावादी सत्ताधारी पक्षासह विराेधकही महिलांना शाही गादीवर बसवण्याच्या बाजूने नाहीत. अलीकडेच पंतप्रधान सुगा यांनी या मुद्यावर आपली स्थिती स्पष्ट केली. ते म्हणाले, सध्याच्या स्थितीत पुरुषांनाच प्राधान्य दिले जायला हवे.
शाही परिवाराचा संकाेच, राजकुमारींना वर मिळेनात
शाही परिवारात १८ सदस्य आहेत. त्यापैकी सहा राजकुमारींचा वर मिळत नसल्याने विवाह हाेत नाही. राजकुमारीने सामान्य व्यक्तीशी विवाह केल्यास अशा सदस्याला राजेशाही प्रतिष्ठा व साेयी गमवाव्या लागतात. परंतु पुरुषांना हा नियम लागू हाेत नाही. १९६५ ते २००६ दरम्यान जपानच्या राजघराण्यात मुलगा जन्मला नाही. २००६ मध्ये राजकुमार हिसाहिताेचा जन्म झाला. सध्या ते भावी सम्राट आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.