आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Hi tech Gadget Boots Will Immediately Alert If Jogging Incorrectly, Challenge From Virtual Runners, Coaches Can Be Heard Even Underwater; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​हायटेक गॅजेट - चुकीची जॉगिंग केल्यास बूट लगेच करेल सावध, आभासी धावपटूकडून आव्हान, पाण्याखालीही कोचचे ऐकता येईल

वॉशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यशस्वी क्रीडापटू होण्यासाठी मदत करेल प्रशिक्षण देणारी स्पोर्टिंग टेक्नॉलॉजी

तुम्ही एकटेच जॉगिंग करत असाल व स्पर्धेसाठी आभासी धावपटू मिळाल्यास कसे वाटेल? योग्य पद्धतीने धावत आहात की नाही हे बुटात लावलेल्या सेन्सरने सांगितले तर... किंवा स्विमिंग करताना तुम्हाला चुका सांगितल्या तर... काही असेच गॅजेट आले आहेत जे व्यावसायिकासारखे प्रशिक्षण देण्यासह मार्गदर्शन व सावधही करतात. या गॅजेटच्या मदतीने तुम्ही चांगले क्रीडापटू होऊ शकता. आजच्या युगातील हे टेकगुरू कशा पद्धतीने तुम्हाला प्रभुत्व मिळवून देतील हे जाणून घ्या...

एका उपकरणाद्वारे तीन वर्कआऊट करू शकाल, रॉडच्या दोन्ही बाजूंना वजन असमान असल्यास इशारा मिळेल, रोबोट शिकवेल

पंचिंग रोबोट: पंचिग बॅगसोबतचा सराव समान स्पर्धा नाही. कारण बॅग पंच करत नाही. स्ट्राइक रोबोटिक यंत्रणा बरोबरीची लढत देते. या रोबोला भिंतीवर लावून उंची कमी-जास्त करू शकता. तर बास्केटबॉल शिकणाऱ्यांसाठी स्मार्ट हूप आहे. कौशल्य सुधारण्याबरोबर त्याची उंची वाढते तर वर्तुळ लहान होत जाते.

हायब्रिड वेट सिस्टिम : घरात व्यायाम करण्यासाठी डंबेल्स, बार बेल्स आणि प्लेट्स असतात. मात्र हायपरबेल यंत्रणेत तीनही व्यायाम करू शकता. यात पॉलिमर क्लॅम्पचा सेट, स्टील बारबेल आणि स्टील कॅटलबेल हँडल असतो. तसेच बारबेलच्या दोन्ही कडेला वजन समान नसल्यास कॅलिब्रेक्स सिस्टिम वापरकर्त्याला बीपद्वारे सावध करते.

स्विमिंग गाइड : पाेहताना सूचना देण्यात अडचणी येतात. सोनर टेकद्वारे पोहणाऱ्यासोबत ट्रेनर रेडिओ तंत्रज्ञानाने बोलू शकतात. त्याचा एक भाग वॉकी- टॉकी प्रशिक्षणाकडे तर दुसरा स्पीकर पोहणाऱ्याकडे असतो. यामुळे त्याच क्षणी निर्देश व फीडबॅक पोहणाऱ्यास मिळत राहतात. ते पाण्याखाली ३.५ फूट आतपर्यंत काम करते.

रनिंग कोच : आयकायनेसिस शू माउंट रनिंग कोचसारखे आहे. हे डिव्हाइस बुटाच्या लेसमध्ये लागते. ते वापरकर्त्याला त्याच क्षणी ध्वनी संदेश आणि व्हायब्रेशनद्वारे सावध करते की योग्य धावत आहात की नाही. तर घोस्ट पेसर एआर रनिंग हेडसेट एक व्हर्च्युअल रूप तयार करते यामुळे सोबत कोणीतरी धावत आहे, असे तुम्हाला वाटते.

बातम्या आणखी आहेत...