आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Hi tech Robots Deliver Food And Groceries In Singapore; Therefore, The Waiting Time Will Be Reduced By 5 15 Minutes; News And Live Updates

मंडे पॉझिटिव्ह:सिंगापूरमध्ये हायटेक रोबोट फूड, किराणा डििलव्हरी करताहेत; त्यामुळे वेटिंग टाइम 5-15 मिनिटे कमी होणार, शिक्षण संस्थांतही ‘रोबोट स्टोअर’ची तयारी

​​​​​​​सिंगापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिंगापुरात चालकविरहित डिलिव्हरीचे स्वप्न साकार साकार होण्याच्या उंबरठ्यावर, 3 ठिकाणी यशस्वी चाचणी

सिंगापूरला कोरोनामुळे ड्रायव्हरलेस डिलिव्हरीचेे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. सध्या रोबोटद्वारे जीवनावश्यक वस्तूंपासून ते अन्नपदार्थांची डिलिव्हरी होत असल्याचे दिसत आहे. सरकारने फेब्रुवारीत ७०० घरवस्तीच्या पंुगगोलमध्ये दोन रोबोटच्या मदतीने चाचणी सुरू केली हाेती. नंतर फूडपांडा कंपनीने २०० हेक्टरमध्ये बनलेल्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीत (एनटीयू) अन्न आणि किराणा मालाच्या डिलिव्हरीसाठी चार रोबोट तैनात केले. फूडपांडाची प्रतिस्पर्धी कंपनी ग्रॅबने रेस्टॉरंटमध्ये डिलिव्हरीसाठी रोबोट रनर सर्व्हिस सुरू करण्याची घोषणा केली.

फूडपांडाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘संपर्कविरहित डिलिव्हरीत आम्हाला डिलिव्हरी क्षमता वाढवणे आणि माफक दरात प्रभावीपणे ग्राहकांची सेवा करण्यास मदत मिळेल. ही चाचणी नोव्हेंबरपर्यंत चालेल. यानंतर आम्ही सिंगापूरमध्ये रोबोटच्या मदतीने डिलिव्हरी करू शकू, अशी आशा आहे. यामुळे प्रतीक्षा काळ ५ ते १५ मिनिटे कमी होईल. एका रोबोट वाहनात १०० बॉक्स येऊ शकतात. एनटीयूमध्ये जे फिरते रोबोट तैनात आहेत ते भविष्यात नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये स्टाफ आणि विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी मोबाइल स्टोअरमध्येही बदलण्याची योजना आहे. अशाच पद्धतीने सिंगापूरमधील वेगवेगळ्या तीन ठिकाणीही रोबोटद्वारे डिलिव्हरी केली जात आहे.

फूडपांडाचे फूडबॉट एआयच्या मदतीने चालते. त्यासाठी खास ट्रॅक तयार करण्यात आले असून ते त्यावरच चालतात. यात लावलेला कॅमेरा डोळे आणि मेंदूसारखे काम करतो. पुंगगोलमध्ये ७०० रहिवाशांदरम्यान हा प्रयोग यशस्वी झाला आहे. रोबोट बनवणारी कंपनी ओटीएसएडब्ल्यूच्या प्रवक्त्याने सांगितले की, केवळ युवकच नव्हे तर वृद्धसुद्धा अॉर्डर पाठवत आहेत. दुसऱ्या भागातील लोकही अशा चाचण्यांची मागणी करत आहेत. रोबोट अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीने युक्त आहेत. त्यामुळे अपघात, ग्राहकांची फसवणूकही होत नाही.

सुरक्षित : ८० कि.ग्रॅ. आहे रोबोटचे वजन, ओटीपीशिवाय कोणतीही वस्तू काढू शकणार नाही ग्राहक
ही यंत्रणा अॅडव्हान्स तंत्रज्ञानावर काम करते. रोबोट डिलिव्हरी घेऊन ग्राहकाने दिलेल्या पत्त्यावर पोहोचतो. लोकेशनवर पोहोचताच ग्राहकाच्या मोबाइलवर नोटिफिकेशन पाठवतो. रोबोटकडून आपली ऑर्डर प्राप्त करण्यासाठी ग्राहकाला रोबोटला लावलेल्या कॅमेऱ्यात आपल्या ऑर्डरचा पुरावा दाखवावा लागतो. त्यानंतर ओटीपीच्या मदतीने ग्राहक आपला बॉक्स उघडून त्यातील वस्तू काढून घेऊ शकतो. एका रोबोट वाहनाचे वजन ८० किलो आहे. त्याची गती ५ किमी प्रतितास ठेवली आहे. मात्र हे रोबोट इमारतीच्या लॉबीपर्यंतच डिलिव्हरी करू शकतील.

बातम्या आणखी आहेत...