आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जास्त कॅलरीचे लेबल असून खानपान सवयी बदलल्या नाहीत, तरुणांचे चवीला प्राधान्य!

लंडन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमध्ये अजूनही तरुण वर्ग आराेग्यापेक्षा चवीला जास्त प्राधान्य देताे. खाद्यपदार्थांवरील लेबलदेखील लाेकांमध्ये आवश्यक जागृती आणू शकलेले नाहीत. ही माहिती वाचूनही लाेकांच्या सवयी बदलू शकल्या नाहीत. लंडनच्या दहा आस्थापनांमध्ये एक प्रयाेग करण्यात आला. येथील कँटीनमध्ये खाद्यपदार्थांवर कॅलरी कंटेंट असलेले लेबल लावण्यात आले. लेबलवरील माहिती उदाहरणाने लक्षात घेऊ. एका बर्गरमधून मिळणाऱ्या कॅलरी खर्च करण्यासाठी २० मिनिटे पायी चालावे लागेल. काेल्ड ड्रिंक्समधून मिळणाऱ्या कॅलरी खर्च करण्यासाठी ३० मिनिटे पायी चालावे लागेल. खाद्यपदार्थांवरील जास्त कॅलरी पाहून तरुण वर्ग आपल्या खानपानाच्या सवयींत काही बदल करू शकताे का, हे संशाेधकांना पाहायचे हाेते.

परंतु या प्रयाेगात सहभागी लाेकांनी कॅलरीबद्दल सतर्क केल्यानंतरही आपल्या पसंतीच्या खाण्यावर ताव मारण्याचे काही साेडले नाही. म्हणजेच लेबलवरील इशारा पाहून लाेकांनी कमी कॅलरीचे पदार्थ खाल्ले नाहीत. केम्ब्रिज विद्यापीठातील वर्तन व आराेग्यासंबंधी संशाेधन करणाऱ्या एका केंद्रानुसार ब्रिटनमध्ये ३० वयाेगटातील मुलांना लठ्ठपणाच्या समस्येला ताेंड द्यावे लागत आहे. खानपानाच्या सवयी आणि स्थूलपणा यांच्यातील संबंध जाणून घेण्यासाठी हे संशाेधन झाले. तीन महिने प्रयाेग करण्यात आला. १० कँटीनमधून तरुणांनी अडीच लाखांहून जास्त पदार्थांची खरेदी केली हाेती. आठ कँटीनमधून तरुणांनी जास्त कॅलरी असलेल्या पदार्थांची खरेदी केली हाेती.

जास्त कॅलरीचे पदार्थ खाल्ल्याने रक्तदाब, मधुमेह
जास्त कॅलरी घेणे हे स्थूलपणाचे एक माेठे कारण ठरते. यातून पुढे कर्कराेग व मधुमेहाचा धाेका संभवताे. कॅलरी कंटेंट व त्याला बर्न करण्यासाठी चालणे, व्यायामाचे लेबल लावणे हे ब्रिटनमध्ये बंधनकारक आहे.

बातम्या आणखी आहेत...