आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाटो देशांत सर्वाधिक दरडोई वृद्धी:पोलंडचे संरक्षण बजेट जीडीपीच्या 4 टक्के

वाॅर्सा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनवरील हल्ल्यानंतर शेजारी रशियाचा धोका पाहता पोलंड युरोपातील सर्वात मोठे लष्कर तयार करत आहे. लष्कराला आधुनिक शस्त्र दिले जात आहे. या वर्षी तो जीडीपीच्या ४% संरक्षण तरतुदींवर खर्च करेल. हे नाटोच्या गरजेपेक्षा दुप्पट आहे. यामुळे तो दरडोई संरक्षणावर सर्वात जास्त खर्च करणारा नाटो सदस्य होईल. पोलंडजवळ आतापर्यंत सोव्हियत संघाच्या काळातील शस्त्रे आहेत. मात्र, युक्रेन युद्धाआधी त्याने लष्कर अद्ययावत करण्याची तयारी सुरू केली होती. युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यानंतर यात अचानक तेजी आली आहे. त्याने अनेक करार केले आहेत. पोलंडचे संरक्षणमंत्री मार्युस्य ब्लासजेक म्हणाले, युक्रेनवरील हल्ला आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा स्वभाव पाहता आम्हाला लष्कराला आधुनिक बनवण्याची प्रक्रिया आणखी वेगवान करावी लागेल. रशिया सीमेवर तैनात ११ व्या आर्टिलरी रेजिमेंटजवळ अद्याप जुनीच शस्त्र होती.

आता प्रत्येक ठिकाणावरून हल्ला करण्यास सक्षम कॅप्टन मॅरेक अडेमियाक यांच्यानुसार, आता अशी कोणती जागा नाही, जेथून आम्ही हल्ला करू शकत नाहीत. आता आमच्याकडे आधुनिक शस्त्रे आहेत.

बातम्या आणखी आहेत...