आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुर्कियेत रविवारी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. मुख्य लढत २० वर्षांपासून सत्तेत असलेले विद्यमान राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दाेगन आणि “गांधी’ नावाने प्रसिद्ध विरोधी पक्षनेते कमाल कलचदारलू यांच्यात आहे. मतदानानंतर काही वेळाने मतमोजणीस सुरुवात झाली. राजधानी अंकारामध्ये सुरुवातीच्या कलात राष्ट्रपती एर्दोगन यंाना आघाडी मिळाली आहे. हिजाबचे समर्थक मानले जाणारे एर्दोगन यांना रविवारी रात्री १२.०० वाजेपर्यंत ५१% मते मिळताना दिसत होते.
त्यांचे प्रतिस्पर्धी कमाल यांच्या खात्यात ४२.८% मते आली. अशा रीतीने ते ८% मतांनी मागे होते. त्याआधी विश्लेषकांनी सांगितले होते की, एर्दाेगन निवडणूक हरल्यास पाश्चिमात्य देशांसाठी दिलासा असेल आणि रशियाची डोकेदुखी वाढेल. एर्दोगन यांनी निवडणूक जिंकल्यास सध्याच्या स्थितीत फार बदल होणार नाही. स्वीडनचे माजी पंतप्रधान कार्ल बिल्ट म्हणाले, आम्हा सर्वांना तणावमुक्त तुर्की हवे आहे.
तुर्की रणनीतीच्या दृष्टीने नाटोचा महत्त्वाचा सदस्य असून तो संकटग्रस्त भागीदार झाला आहे. एर्दोगन यांच्या नेतृत्वाखाली तुर्की, रशियाचा अपरिहार्य व्यापार भागदार झाला आहे. एर्दाेगन यांनी अलिप्त विदेश धोरणाचे अनुकरण केले आहे. यामुळे त्याने पाश्चिमात्यांना निराश केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.