आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Hilippine Military Plane । 85 People । Crashes । Basic Military Training; News And Live Updates

फिलिपाईन्समध्ये विमान अपघात:85 लोकांना घेऊन जाणारे लष्करी विमान लँडिंगच्या वेळी झाले क्रॅश; 17 जणांचा मृत्यू, 40 जणांना वाचविण्यात आले यश

मन‍िलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पघातादरम्यान या व‍िमानाला सुलू राज्यातील जोलो आयलँडवर लँड‍िंग करण्यासाठी प्रयत्न सुरु होते.

फ‍िल‍िप‍िन्समध्ये 85 लोकांना घेऊन जाणारे लष्करी व‍िमान लँड‍िंगच्या वेळी क्रॅश झाल्याची घटना रव‍िवारी घडली. लष्कराच्या सी-130 या व‍िमानाने कागायन डी ओरो शहरातून उड्डाण घेतली होती. दरम्यान, या घटनेमध्ये 17 लोकांचा मृत्यू असून यातून 40 जणांना वाचवण्यात यश आले आहे. वाचवण्यात आलेल्या त्या लष्करांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे आर्मी चीफ जनरल स‍िर‍िलीटो सोबेजाना यांनी AFP शी बोलताना सांग‍ितले. ते पुढे म्हणाले की, अपघातादरम्यान या व‍िमानाला सुलू राज्यातील जोलो आयलँडवर लँड‍िंग करण्यासाठी प्रयत्न सुरु होते.

सोबेजाना म्हणाले की, आम्हाला घटनेची माह‍िती म‍िळताच मदत व बचाव दलाला घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. मी देवाला प्रार्थना करतो की, यामध्ये कमीत कमी लोकांचे नुकसान व्हावे. कारण यातील जास्तीत जास्त लोकांनी नुकतेच मुलभूत लष्करी प्रश‍िक्षण घेतले होते.

आयलँड्स मध्ये प्रवास अबु सैफ दहशतवादी संघटना सक्र‍िय
अपघात व‍िमानातील जास्तीत जास्त सैनिकांनी अलीकडेच बेसिक मिलिट्री प्रशिक्षण घेतले होते. अपघातग्रस्त लोकांना दहशतवादी कारवायांसाठी प्रसिद्ध असलेल्या आयलँड्स बेटांवर तैनात केले जाणार होते. फिलिपाईन्सच्या या बेटांवर मुस्लिम लोकसंख्या बहुसंख्य आहे. येथे एखाद्याला खंडणीसाठी पळवून नेणे सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे येथे जास्तीत जास्त सैन्य तैनात असतात. हा भाग दक्ष‍िण फ‍िल‍िपाईन्समध्ये येत असून येथे अबु सैफ दहशतवादी संघटना सक्र‍िय आहे.

बातम्या आणखी आहेत...