आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्लामाबाद:मशिदीतून पाणी घेतल्याने हिंदू कुटुंबाला मारहाण; ओलीस ठेवले, अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल

इस्लामाबाद / नासिर अब्बास4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात हिंदूंवरील हल्ल्याच्या घटनांत वाढ होत आहे. पंजाब प्रांतातील रहीमयार खान जिल्ह्यातील चक -१०६ येथील वस्ती कहूर खानमध्ये मशिदीतून पिण्याचे पाणी घेतल्याने हिंदू शेतकरी कुटुंबाला ओलीस ठेवण्यात आले. हिंदू अधिकार कार्यकर्ता पेट्टर जॉन भेल यांनी दै. भास्करला सांगितले की, ही घटना काही दिवसांपूर्वीची आहे. आलम राम भील पत्नी आणि कुटुंबीयांसह शेतीत कापूस उचलण्याचे काम करतात. तहान लागल्यामुळे त्यांनी मशिदीतील नळाचे पाणी घेतले. यावर जमीनदारांनी मशिद अपवित्र केल्याचा आरोप करत पूर्ण परिवाराला बंधक करून आलम राम भीलला मारहाण केली.

पेट्टर यांनी सांगितले की, जमीनदारांनी पूर्ण कुटुंबाला अनेक तास बंधक बनवले. नंतर काही स्थानिक ज्येष्ठांच्या हस्तक्षेपानंतर त्यांना सोडून देण्यात आले. ज्येष्ठ वकील फारुख रिंद म्हणाले की, ‘आम्ही बस्ती कहूर क्षेत्रातील आहोत. येथे भील अनेक शतकांपासून राहत आहेत. आरोपी जमीनदार यापूर्वीही हिंसा आणि मारहाणीच्या प्रकारात सहभागी होता.’ पीटीआयच्या दक्षिण पंजाब अल्पसंख्याक शाखेचे सरचिटणीस युधिष्ठिर चौहान यांनी म्हटले की, ‘घटनेवर आमचे लक्ष आहे. मात्र खासदारांच्या प्रभावामुळे आम्ही हस्तक्षेप केला नाही.’ तर आरोपी पीटीआयच्या खासदाराचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे भील समुदाय धरणे देण्यास बसला. त्यामुळे शेवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, जिल्हा उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात स्थानिक पोलिस प्रमुख, प्रशासकीय अधिकारी, हिंदू प्रतिनिधी आणि स्थानिक ज्येष्ठ नागरिक हजर होते. या घटनेत सहभागी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची ग्वाही या वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...