आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्लामाबाद:पाकमध्ये प्रशासकीय अधिकारीपदी हिंदू तरुणी, प्रशासकीय अधिकारी हाेऊ नये अशी आई-वडिलांची इच्छा

इस्लामाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या हिंदू तरुणीने देशातील सर्वात कठीण परीक्षेत यश मिळवले आहे. २७ वर्षीय डाॅक्टर सना रामचंद गुलवानीने सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेसची (सीएसएस) परीक्षा उत्तीर्ण झाली हाेती. परंतु आता त्यांच्या नियुक्तीवर माेहर लागली आहे. सना मूळची सिंध प्रांतातील शिकारपूरची रहिवासी आहे. त्यांनी सिंधच्या ग्रामीण भागात असूनही जिद्दीने यश मिळवले. ही जागा पाकिस्तानच्या प्रशासकीय सेवेअंतर्गत येते.

यशाबद्दल सना म्हणाली, मी खूप आनंदी आहे. हा माझा पहिला प्रयत्न हाेता. मला त्यात यश मिळवायचे हाेते. त्यासाठी मी दृढसंकल्प केला हाेता. सुरुवातीपासून कठाेर परिश्रम करत आले आहे. आई-वडिलांना मी प्रशासकीय क्षेत्रात यावे असे मुळीच वाटत नव्हते. त्यांना मी मेडिकल व्यवसायात जावे असे वाटत हाेते. परंतु मी दाेन्हीही गाेष्टी साध्य केल्या. आई-वडिलांचेही स्वप्न साकार करू शकले. सीएसएसची परीक्षा उत्तीर्ण करून गृहितक माेडित काढले आहे. आता मी वैद्यकीय व्यवसायाबराेबरच प्रशासकीय सेवेचाही भाग असेल.

सनाचे सरकारी शाळेत शिक्षण झाले आहे. सनाने पाच वर्षांपूर्वी शहीद माेहतरमा बेनझीर भुत्ताे मेडिकल युनिव्हर्सिटीमधून बॅचलर आॅफ मेडिसिनमध्ये पदवी संपादन केली आहे. तेव्हापासून त्या शल्यचिकित्सकही आहेत. पाकिस्तानात हे दाेन्ही अभ्यासक्रम साेबत असतात. युराॅलाॅजीमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यानंतर त्या केंद्रीय लाेकसेवा आयाेगाच्या तयारीला लागल्या हाेत्या.

सीएसएस : सरासरी २ टक्के विद्यार्थी होतात यशस्वी
पाकिस्तानात सीएसएसची परीक्षा सर्वाधिक कठीण मानली जाते. पाकिस्तानात त्याद्वारे प्रशासकीय सेवांमध्ये नियुक्त्या हाेतात. यंदा यातून एकूण २ टक्के परीक्षार्थी यशस्वी हाेतात. या कठीण परीक्षेबद्दल सना म्हणाल्या, लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेची तुलना वैद्यकीय परीक्षेशी केल्यास ती काही प्रमाणात साेपी असते. त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला. स्वत:वर विश्वास ठेवा. काेणतीही परीक्षा उत्तीर्ण करता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...