आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान इम्रान खान यांचे आवाहन:हिंदुस्थान प्रामाणिक देश; इम्रानकडून पुन्हा कौतुक, लोकांना रस्त्यावर उतरण्याचे इम्रान यांचे आवाहन

इस्लामाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नॅशनल असेंब्लीतील अविश्वास प्रस्तावाआधी शुक्रवारी रात्री देशाला संबोधित केले. त्यात त्यांनी लोकशाहीचा राग आळवला. लोकशाही वाचवण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या लोकांचे हित तुमच्या हातात आहे. लष्कर लोकशाहीचे रक्षण करणार नाही. लोकांनीच पुढे आले पाहिजे. विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाला कटकारस्थान ठरवत त्यांनी पुन्हा एकदा भारताचे कौतुक केले. हिंदुस्थान प्रामाणिक देश असल्याचे इम्रान म्हणाले.

विदेशी कट : आयोग नेमला
इम्रान यांनी सरकार पाडण्यासाठी विदेशी कटाच्या पत्राची सत्यता पडताळण्यासाठी आयोग स्थापन केला आहे. निवृत्त ले.जनरल तारिक खान यांच्या अध्यक्षतेखालील आयोग पत्राची चौकशी करून ९० दिवसांत अहवाल देईल. इम्रान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी म्हणाले, ८ बंडखोर खासदार विदेशींच्या संपर्कात होते.