आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रथमच:मंगळावर उड्डाण घेत नासाच्या हेलिकॉप्टरचा इतिहास; पृथ्वीवरील उड्डाणाच्या 117 वर्षांनंतर 28.93 कोटी किमी लांब दुसऱ्या ग्रहावर हेलिकॉप्टरचे यशस्वी उड्डाण

ग्वाटेमाला सिटीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ओझोनचे आवरण पातळ करत आहे रेफ्रिजरेंट गॅस

नासाच्या दोन किलो वजनाच्या हेलिकॉप्टरने मंगळ ग्रहावर पहिले उड्डाण घेत इतिहास रचला. लहान आकाराचे हे हेलिकॉप्टर उड्डाणावेळी १० फूट उंच उडण्यात यशस्वी राहिले. पृथ्वीबाहेर दुसऱ्या ग्रहावर एखाद्या हेलिकॉप्टरचे हे पहिले उड्डाण होते. याबाबत नासा सायन्स मिशन डायरेक्टोरेटचे सहयोगी प्रशासक थॉमस जुरबुकेन यांनी पथकाला शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले, राइट ब्रदर्सनी पृथ्वीवर पहिले उड्डाण घेतल्याच्या ११७ वर्षांनंतर नासाच्या इंजेव्हिनिटीने पृथ्वीपासून २८.९३ कोटी किमी लांब एखाद्या दुसऱ्या ग्रहावर (मंगळ) यशस्वी उड्डाण केले. राइट ब्रदर्सनी उड्डाण घेणे व इंजेंव्हिनिटीचे मंगळावरील उड्डाण दाेन्ही अभिमानास्पद व अविस्मरणीय आहे. मंगळावरील इंजेंव्हिनिटीचे उड्डाण व राइट ब्रदर्सचे उड्डाण आज एक झाले.

थॉमस यांनी हेलिकॉप्टर इंजेंव्हिनिटीच्या एअरफील्डला राइट ब्रदर्सचे नाव दिले आहे. नासानुसार पृथ्वीवर उड्डाण घेणाऱ्या हेलिकॉप्टरचे ब्लेड एक मिनिटात ४००-५०० वेळा फिरते, तर मंगळावर पाठवलेले हेलिकॉप्टर इंजेंव्हिनिटीचे ब्लेड उड्डाणादरम्यान २५०० फेऱ्या मिनिटात मारते. म्हणजे इंजेंव्हिनिटीचे ब्लेड पृथ्वीवर उडणाऱ्या हेलिकॉप्टरच्या तुलनेत चारपट वेगाने फिरले. इंजेंव्हिनिटीच्या उड्डाणावेळी नासाने त्याचे थेट प्रसारणही केले. या उड्डाणाआधी नासाने त्याच्याशी संबंधित प्रश्नांची माध्यमांना उत्तरे दिली. नासाकडून प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी नासा सायन्स मिशन डायरेक्टोरेटचे सहयोगी प्रशासक थॉमस जुरबुकेन, जेपीएल संचालक मिशले वाॅटकिन्स, मार्स हेलिकॉप्टर प्रकल्प व्यवस्थापक मीमी आँग इंजेंव्हिनिटीचे मुख्य अभियंते बॉब बलराम उपस्थित होते.

एंजल यांना त्यांच्या मोहिमेत मदत करतेय टेडवॉटर्स नावाची कंपनी. या कंपनीची पथके जगभरात शासकीय, खासगी कंपन्या आणि लोकांसोबत पर्यावरणाची हानी करणारे गॅस शोधणे, त्यांना सुरक्षित ठेवणे, सुरक्षित पद्धतीने नष्ट करण्याच्या पद्धती शोधत आहेत. रेफ्रिजरेंट गॅसवर काम करत असल्याने त्यांचे सहकारी त्यांना ‘चिल हंटर्स’ देखील म्हणतात. मंगळाच्या वातावरणात उड्डाण करणे पृथ्वीच्या तुलनेत अवघड नासाने सांगितले की, इंजेंव्हिनिटीचे मंगळाच्या वातावरणात उड्डाण करणे पृथ्वीवरील उड्डाणाच्या तुलनेत जास्त अवघड आहे. मात्र, ते बघणाऱ्यांनी यूट्यूबवर स्ट्रीमिंगदरम्यान लिहिले की, हे एवढेही कठीण वाटले नाही.

रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनरसारख्या उपकरणांत क्लोरो-फ्लोरो कार्बनचा (सीएफसी) वापर होतो. ओझोन आवरणाचे हाच वायू सर्वाधिक नुकसान करतो. सीएफसीतून निघणारा क्लोरिन गॅस ओझोनच्या तीन ऑक्सिजन अणूंपैकी एकाद्वारे प्रतिक्रिया देतो. ही प्रक्रिया सुरू असते आणि क्लोरिनचा एक अणू ओझोनचे १० लाख अणू नष्ट करतो. यामुळे ओझोनचे आवरण सतत पातळ होत असते.

बातम्या आणखी आहेत...