आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएचआयव्हीच्या उपचाराच्या दिशेने संशाेधकांना माेठे यश मिळाले आहे. जगात पहिल्यांदाच गर्भनाळेच्या रक्तापासून एचआयव्हीवर यशस्वी उपचार करण्यात आले. एचआयव्हीवर यशस्वी उपचार झालेली ही जगातील तिसरी, तर अमेरिकेतील पहिली महिला रुग्ण ठरली आहे. त्याआधी दाेन पुरुषांवर बाेनमॅराेच्या (अस्थिमज्जा) प्रत्याराेपणातून उपचार करण्यात आला हाेता, परंतु आता पहिल्यांदाच महिलेवर हा उपचार झाला. डेनेव्हरच्या डाॅक्टरांनी ताे पूर्ण केला. डाॅक्टर म्हणाले, गर्भनाळेच्या रक्तापासून एचआयव्हीवर यशस्वी उपचार यापुढे नव्या युगाची सुरुवात ठरतील. नाळेतून रक्त मिळवणे अस्थिमज्जेच्या तुलनेत साेपे आहे. महिला श्वेतवर्णीय पण कृष्णवर्णीय वंशातील हाेती.
आतापर्यंत उपचार झालेले दाेन्ही पुरुष श्वेतवर्णीय हाेते. म्हणूनच नाळेतील रक्ताच्या साह्याने हाेणाऱ्या उपचारातून नवीन शक्यता समाेर आल्या आहेत. डाॅ. काेएन वॅन बेसियन म्हणाले, गर्भनाळेच्या उपचारातून रुग्णांना खूप मदत मिळणार आहे. अशा रक्ताशी अांशिक मेळ बसल्यानंतर उपचार हाेत असल्याने एचआयव्हीवरील उपचारासाठी माेठ्या संख्येने दाते मिळू शकतात. ही महत्त्वाची गाेष्ट ठरते. बाेनमॅराेमध्ये सुसंगत दाता मिळवणे अत्यंत कठीण काम ठरते. त्यामुळेच नवे संशाेधन एचआयव्हीवरील उपचारासाठी संजीवनीचे काम करू शकेल. कॅलिफाेर्निया विद्यापीठातील डाॅ. स्टीव्हन डिस्क यांच्या म्हणण्यानुसार गर्भनाळ जादुई असते. महिलेला २०१३ मध्ये एचआयव्ही झाल्याचे निदान झाले हाेते. त्याशिवाय कर्कराेगही हाेता. त्यावर हॅप्लाे-काॅर्ड ट्रान्सप्लांटने उपचार झाले. त्यानंतर गर्भनाळेच्या रक्ताच्या साह्याने तिच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. २०१७ नंतर महिलेचा रक्ताचा कर्कराेगही बरा झाला आहे. तिला आता काेणतीही आैषधी घ्यावी लागत नाही. बाेनमॅराेद्वारे उपचार झालेल्या रुग्णांना अजूनही अनेक गुंतागुंतीला ताेंड द्यावे लागत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.