आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Hizbul Mujahideen Chief Syed Sallahuddin, Dawood Ibrahim Chhota Shakeel, Among 18 Designated Terrorists

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहशतवाद्यांवर अॅक्शन:पाकिस्तानच्या हिज्बुल प्रमुख सलाहुद्दीनसह 18 दहशतवाद्यांना सरकारने घोषित केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीमध्ये केले समाविष्ट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिवेंशन अॅक्ट (UAPA)1967 कायद्या अंतर्गत गृहमंत्रालयाने ही कारवाई केली आहे.

सरकारने 18 दहशतवाद्यांचे नाव घोषित दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ठ केले आहेत. हे सर्व पाकिस्तानातील आहेत आणि तेथील दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत. अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिवेंशन अॅक्ट (UAPA)1967 कायद्या अंतर्गत गृहमंत्रालयाने ही कारवाई केली आहे. या 18 दहशतवाद्यांमध्ये हिज्बुल मुजाहिदीनचे चीफ सैय्यद सलाहुदीनसह मुंबई दहशतवादी हल्ला, संसदेवरील हल्ला आणि कंधार विमान हायजॅकमध्ये सामिल असलेल्या दहशतवाद्यांचेही नावे आहेत.

घोषित दहशतवाद्यांच्या यादीत कोणाकोणाचा समावेश?

साजिद मीरलष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि मुंबई हल्ल्याची योजना आखणारा
यूसुफ मुजाम्मिललष्करचा कमांडर आणि मुंबई हल्ल्याचा आरोपी
अब्दुल रहमान मक्कीलष्कर चीफ हाफिज सईदचा ब्रदर इन लॉ
शाहिद महमूदलष्कर संघटना FIF चा डिप्टी चीफ
फरहतुल्लाह गौरी2002 मध्ये अक्षरधाम मंदिरावर झालेला हल्ला आणि 2005 मध्ये हैदराबादमध्ये टास्क फोर्स ऑफिसवरील हल्ल्यात सहभागी होता.
अब्दुल रउफ असगर2001 मध्ये संसदेवरील हल्ल्यातील योजना आखणारा
इब्राहिम अतहर1999 मध्ये कंधार विमान हायजॅकमध्ये सामिल आणि संसदेवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार
यूसुफ अजहरकंधार विमान हायजॅकमध्ये होता सहभागी
शाहिद लतीफभारतात जैश-ए-मोहम्मदचे नेटवर्क उभारणे आणि दहशतवादी घटनांमध्ये सामिल
सैयद मोहम्मद यूसुफ शाह उर्फ सैयद सलाहुदीनहिज्बुल मुजाहिदीनचा सुप्रीम कमांडर, भारतात दहशतवादी कारवायांसाठी पैसे जमा करण्यात सहभागी
गुलाम नबी खानहिज्बुल मुजाहिदीनचा डीप्टी सुप्रीम
जफर हुसैन भटहिज्बुलचा डिप्टी चीफ, कश्मीरमध्ये हिज्बुलसाठी फंडिंगचे काम पाहतो
रियाज इस्माइल शाहबांदरीइंडियन मुजाहिदीनचा फाउंडर. भारतात जर्मन बेकरी, चिन्नास्वामी स्टेडियम, जामा मस्जिद आणि मुंबई हल्ल्यात होता सहभागी
मोहम्मद इकबालजयपुर, दिल्ली, अहमदाबाद, सूरतमध्ये झालेल्या सीरियल ब्लास्टकमध्ये शामिल होता.
शेख शकीलदाऊद इब्राहिमच्या अंडरवर्ल्डसंबंधित काम पाहत होता. 1993 मध्ये गुजरातमध्ये हत्यारांच्या स्मगलिंगमध्ये होता सामिल.
मोहम्मद अनीस खान1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोटाच्या कटात सहभागी होता.
इब्राहिम मेनन उर्फ टाइगर मेननमुंबई ब्लास्टच्या कटात सहभागी होता.
जावेद चिकनामुंबई ब्लास्टच्या घटनांमध्ये सहभागी होता.