आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाम-मिझोराम सीमावाद:गृहमंत्री अमित शहांची आसाम, मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर चर्चा, चर्चेतून वाद सोडवण्याचा दिला सल्ला

गुवाहाटी/आयझोल/नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आसामची नाकेबंदी : मिझोराममध्ये पेट्रोल-डिझेलसह वस्तंूची टंचाई

मिझोराम सीमेवरील तणावामुळे आसामात केलेली नाकेबंदी रविवारी सहाव्या दिवशीही सुरू होती. यामुळे मिझोराममध्ये पेट्रोल, डिझेल आणि इतर आवश्यक वस्तूंची टंचाई सुरू झाली आहे. स्थिती बघून राज्यातील सर्व पेट्रोल पंपांवर रेशनिंग सुरू करण्यात आले आहे. मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल- डिझेलसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे. सध्या दुचाकींसाठी रोज तीन लिटर आणि चारचाकींसाठी पाच लिटर किंवा डिझेलची मर्यादा आहे. मिझोरामचे प्रधान सचिव लालननमविया चुआंगो यांनी राज्यात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई होत असल्याचे मान्य केले आहे.

सीमावादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा आणि मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथंगा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

सीमावाद सोडवण्यात केंद्र अपयशी : काँग्रेस
काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले आहे की, दोन्ही राज्यांमध्ये शांतता राखण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितले, आसाम, मिझोराम दरम्यानचा तणाव गंभीर चिंतेचा विषय आहे.

बिस्व सरमांवरील गुन्हा मागे घेण्यास मिझोराम तयार
मिझोरामचे मुख्य सचिव लालननमविया चुआंगो यांनी सांगितले की, आसामच्या मुख्यमंत्र्यांविरोधात दाखल गुन्हा मागे घेण्यास मिझोराम तयार आहे. तर बिस्व सरमा यांनी सीमावाद सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जायचे म्हटले आहे.

हिंसाचाराच्या सीबीआय चौकशीला केंद्राचा नकार
हे होते प्रकरण :
आसाम- मिझोराम सीमेवर २६ जुलैला हिंसाचार झाला. यात आसामचे पाच पोलिस व इतर दोन ठार झाले होते. मिझोरामच्या वेरेंगटे पोलिसात बिस्वसरमा, आसामचे सहा पोलिस अधिकारी, दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिझोरामने एकूण २०० जणांना आरोपी केले आहे.

आयझोलच्या पेट्रोल पंपावर सध्या असे फलक दिसत आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारने हिंसाचाराची चौकशी सीबीआयद्वारे करण्यास नकार दिला आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एक दिवस आधीच म्हटले होते की, ते चौकशीत सहभागी होतील मात्र निःपक्ष यंत्रणेला चौकशी सोपवण्यात यावी. २६ जुलैच्या हिंसाचाराच्या घटनेनंतर दोन्ही राज्यांमध्ये तणाव आहे. आसामच्या कछार जिल्ह्यात आंतरराज्यीय सीमेजवळ लैलापूर आणि परिसरातील स्थिती तणावपूर्ण आहे. राष्ट्रीय महामार्ग- ३०६ वर मोठ्या संख्येत अर्धसैनिक दल तैनात आहे.

बातम्या आणखी आहेत...