आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाने हाहाकार:हाँगकाँगमध्ये मृत्यू झपाट्याने वाढले; शवपेट्यांचा तुटवडा, सर्वाधिक बाधित कोरियाच्या तुलनेत हाँगकाँगचा मृत्यूदर 15 पट जास्त

हाँगकाँग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाँगकाँग आज कोरोनाचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट बनला आहे. देशातील बाधितांची संख्या १० लाखांहून जास्त झाली. पैकी सात लाख बाधित याच महिन्यात आढळून आले. दररोज सुमारे २२ हजार नवे बाधित आढळून येत आहेत. २५० हून जास्त जणांचा रोज मृत्यू होत आहे. त्यामुळे मृतदेहांसाठी आवश्यक शवपेट्यांची तुटवडा जाणवू लागला आहे. प्रति १० लाख लोकांमागे गेल्या आठवड्यात ३८ जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी ब्रिटन, स्पेनमधील मृत्युदराहून ही संख्या दुप्पट आहे. तेव्हा दोन्ही देशांत प्रति १० लाख लोकांमागे २० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील डेटानुसार हाँगकाँगचा मृत्युदर अमेरिकेच्या पीकपेक्षा तीनपट जास्त आहे. हाँगकाँगमध्ये नवीन बाधितांच्या तुलनेत मृत्युदर १.४ टक्के राहिला आहे. जगभरातील ०.२८ टक्क्यांहून पाच पट जास्त आहे. दक्षिण कोरियात सर्वाधिक ३.८५ लाख बाधित आढळून येत आहेत. त्यांचा मृत्युदर केवळ ०.०८ टक्के आहे.

दक्षिण कोरियात रुग्णसंख्या जास्त
देश नवे रुग्ण मृत्यू मृत्यूदर%
दक्षिण कोरिया 381,329 319 0.08
जर्मनी 168,187 119 0.07
व्हिएतनाम 150618 77 0.05
फ्रान्स 98,104 62 0.06
जपान 49210 155 0.3
हाँगकाँग 20,082 265 1.4

अमेरिकेत नव्या लाटेची शक्यता, पण पूर्वतयारी काहीही नाही
कोरोनाचे लाखो रुग्ण हाताळणाऱ्या अमेरिकेत दोन महिन्यांत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात राहिली आहे. मात्र पुन्हा नव्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनासोबत राहताना विषाणूचा मुकाबला कसा करायचा याची परीक्षा अद्याप बाकी आहे. स्थानिक, राज्य, देश पातळीवरील निर्बंध हटवण्यात आले. सामान्य स्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नव्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेने विशेष प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे अमेरिकन नागरिकांचा जीव संकटात पडू शकतो. नवीन लाट कधी येईल, हे मात्र तज्ञांना निश्चितपणे सांगता आले नाही.

पार्किंग डेकमध्ये ५० कंटेनरची व्यवस्था
मृतदेहांना रेफ्रिजिरेटेड शिपिंग कंटेनरमध्ये ठेवावे लागत आहे. लॉजिस्टिक्स संचालक एलन लियुंग म्हणाले, कोविडमुळे शवपेट्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे अडचणींत वाढ झाली.सार्वजनिक रुग्णालय परिसरात गर्दीच्या ठिकाणी मृतदेहांना ठेवण्यासाठी ट्रकचे रेफ्रिजिरेटर तैनात आहेत. २३०० मृतदेह ठेवण्यासाठी पार्किंग डेकमध्ये ५० कंटेनर ठेवलेले आहेत. निर्बंधांचा आढावा सोमवारी घेतला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...