आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Hope To The Villagers Near Suez; Ship TV fridges Will Be Available; 73,000 Crore Daily Loss Due To Canal Collapse Worldwide News And Updates

इजिप्त:सुएझजवळील गावकऱ्यांना आशा; जहाजातील टीव्ही-फ्रिज मिळतील; नहरमधील घटनेमुळे जगभरात दररोज 73 हजार कोटींचे नुकसान

इजिप्त6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सहाव्या दिवशी केवळ दाेन इंचापर्यंत जहाजाला हलवता येऊ शकले

इजिप्तमधील सुएझ कालव्यात अडकलेल्या ४०० मीटर लांबीच्या मालवाहू जहाजामुळे जगभरात दरराेज सुमारे ७३ हजार काेटी रुपयांचे नुकसान हाेत आहे. हे जहाज बाहेर काढण्यासाठी माेठमाेठी यंत्रे मागवली जात आहेत. ते पाहण्यासाठी नहर किनाऱ्यावरील गाव मँशेट रुगाेला गावातील लाेकांची गर्दी हाेत आहेत. सुमारे ५ हजार लाेकसंख्येच्या गावातील लाेकांना जहाजातील सामान आपल्याला मिळेल, अशी आशा वाटते.

जहाजात टीव्ही-फ्रिज, एसी, पंखे, वाॅशिंग मशीन इत्यादी इलेक्ट्रिक सामान आहे. जहाज रिकामे करण्यासाठी त्यामधील सामान काढले जाईल व ते सामान किनाऱ्यावर साेडून दिले जाईल. हे सामान माेफत मिळेल असे गावकऱ्यांना वाटते. ६५ वर्षीय उम्म गाफर दरराेज जहाजाच्या जवळ येतात. तासन््तास त्या जहाजाकडे आशाळभूत नजरेने पाहत असतात. त्या म्हणाल्या, आजपर्यंत येथे एवढी माेठे यंत्र पाेहाेचले नव्हते. म्हणून पाहायला आले आहे. जहाज बाहेर काढण्यासाठी विशेष माेहीम राबवली जात आहे. कारण, कालव्याच्या दाेन्ही बाजूने ३२५ हून जास्त लाेक जहाज काढण्याची प्रतीक्षा करत आहेत. सहा दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत.

सहाव्या दिवशी केवळ दाेन इंचापर्यंत जहाजाला हलवता येऊ शकले. शाेइ किसेन ही जहाजाची मालक कंपनी आहे. जहाजाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात अपयश आल्यास त्यामधील वस्तूंना हटवण्याचा विचार करेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...