आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वेगात पसरत आहे. नुकत्याच झालेल्या आंदोलनानंतर चीनने झीरो काेविड धोरणात सवलत दिली होती. यानंतर रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. स्थिती एवढी गंभीर झाली आहे की, रुग्णालयातील सर्व खाटा भरल्या आहेत. औषध नाही, जिथे कुठे असेल तिथे रांगा लावाव्या लागत आहेत. बीजिंमध्ये स्मशानभूमीत २४ तास अंत्यसंस्कार केले जात आहेत. येथील स्थिती एवढी वाईट की,अंत्यसंस्कारसाठी वेटिंग २००० पर्यंत पोहोचले आहे. हेबेई राज्यातील एका अंत्यविधी केंद्रात काम करणारा तरुण म्हणाला की, येथे रोज २५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केला जात आहे. डिसेंबरआधी ही संख्या केवळ ४ होती.
ग्वांगडॉगमध्ये स्मशानभूमीत कार्यरत एक अन्य कर्मचारी म्हणाला की, एवढे जास्त पार्थिव येत आहेत की, आेव्हरटाइम काम करावे लागत आहे. मृतांमध्ये बहुतांश ज्येष्ठ नागरिक आहेत. तज्ज्ञांनुसार, चीनमध्ये कोरोना रुग्ण दिवसांनी नव्हे तर तासांत दुप्पट होत आहेत. अमेरिकेच्या इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनच्या अंदाजानुसार, २०२३ पर्यंत चीनमध्ये कोरोनामुळे १० लाखांपेक्षा जास्त मृत्यू होतील. हा अंदाज चीनमध्ये कोविड निर्बंध संपल्यानंतरची स्थिी लक्षात घेऊन व्यक्त केला आहे.अमेरिकी शास्त्रज्ञ आणि महामारी तज्ज्ञ एरिक फेगल-डिंग यांनी सोशल मीडियावर चीनचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात रुग्णालये, स्मशानभूमी, मेडिकल स्टोअर्सची चिंताजनक स्थिती दिसते. ९० दिवसांत चीनची ६०% व जगातील १०% लोक कोरोनाने संसर्गित होतील.
उतार: चीनची वित्तीय तूट विक्रमी ९० लाख कोटींच्या पातळीवर झीरो कोविड धोरणामुळे चीनमध्ये वित्तीय तूट या वर्षी आतापर्यंतच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ब्लूमबर्गने सांगितले की, जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत चीनची महसुली तूट १.१ ट्रिलियन डॉलर(सुमारे ९० लाख कोटी रु.) होती. ही गेल्या वर्षीच्या समान अवधीच्या दुपटीपेक्षा जास्त आणि २०२० च्या तुलनेत खूप जास्त आहे.
आर फॅक्टर १६ झाला, हा सर्वात जास्त तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये आर फॅक्टर १६ वर पोहोचला आहे. कोरोना काळात कोणताही देश या पातळीपर्यंत पोहोचला नव्हता. आर फॅक्टरचा अर्थ एक संसर्गित व्यक्ती सरासरी किती लोकांना संसर्गित करत आहे. हा चिंतेचा विषय आहे.
तिसरी लाट शक्य, नववर्षात आणखी २ महामारी तज्ज्ञ वू जुनयू यांच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये संभाव्य तिसऱ्या लाटेपैकी पहिली लाट सुरू आहे. यानंतर दुसरी लाट जानेवारीदरम्यान येईल. तेव्हा देशात आठवडाभर लूनर इयर सेलिब्रेशन चालते. यात लोक देशभर फिरतात. अशा स्थितीत रुग्णसंख्या वाढू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.