आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Houses Being Built In America In One Hour Musk Also Lives In A Similar House; House Getting Ready For Rs 80 Lakh

अमेरिकेत तासाभरात बांधली जात आहेत घरे:मस्कही अशा घरात राहतात; 80 लाखात घर तयार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत महागाई वाढली असून 2020 मध्ये अमेरिकेतील घरांची किंमत $3,29,000 म्हणजेच 2.62 कोटी रुपये होती, ती आता 30% ने वाढून $4,28,700 म्हणजेच 3.42 कोटी रुपये झाली आहे. अनेक मध्यम उत्पन्न लोक घर खरेदी करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत लोक बॉक्सेबल नावाच्या स्टार्टअपकडे पर्याय म्हणून पाहत आहेत.

बॉक्सेबल ही एक अशी कंपनी आहे, जी केवळ $54,500 मध्ये म्हणजे 43.50 लाख ते $99,500 म्हणजेच 80 लाख रुपयांमध्ये घर बांधते. विशेष म्हणजे बॉक्सेबल हे घर अवघ्या एका तासात उभे करते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क देखील बॉक्सेबलच्या घरात राहतात.

मिनिटाला घर
बॉक्सेबल ही लास वेगास येथील कंपनी आहे. याची सुरुवात 2017 मध्ये पाओलो टियरमनी यांनी केली होती. या कंपनीची स्थापना करताना पावलोचे ध्येय होते दर मिनिटाला एक घर बांधणे. सध्या एका तासात घर बांधण्यात त्यांना यश आले आहे. पाओलो म्हणतो की, आमच्या तंत्रज्ञानामुळे ती गोष्ट शक्य झाली आहे, जी पूर्वी शक्य नव्हती.

कॅसिटा घरांमध्ये या सुविधा

  • पूर्ण आकाराचे स्वयंपाकघर: फ्रीज, सिंक, ओव्हन, डिशवॉशर, मायक्रोवेव्ह आणि कॅबिनेट उपलब्ध आहेत.
  • स्नानगृह: सिंक, मोठे काउंटर, आरसा आणि स्लाइडिंग काच यांना जागा आहे.
  • लिव्हिंग रूम: हे 375 चौरस फुटांची असते. 8 दरवाजे आणि खिडक्या असतात. लाकडी मजला आणि AC ची सुविधा
बातम्या आणखी आहेत...