आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • How Did New York Become The Safest City? People Don’t Go Out In Unlock; Mask distancing And Cycle Became Culture

शिकवण:न्यूयॉर्क कसे सर्वात सुरक्षित शहर झाले? मास्क-डिस्टन्सिंग, सायकल संस्कृती, अनलॉकमध्ये लोक बाहेर पडत नाहीत

न्यूयॉर्कहून ‘दिव्य मराठी’साठी मोहंमद अलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरामागील अंगणात होत आहेत लहान पार्ट्या, क्वॉरंटाइनचे नियम मोडल्यावर 7.5 लाख रु. दंड

जगातील सर्वात संक्रमित शहर राहिलेले न्यूयॉर्क आता अमेरिकेतील सर्वात सुरक्षित स्थळ आहे. तेथील २ कोटी लोकांच्या स्वयंशिस्तीमुळे संसर्गाला हार मानावी लागली आहे. बुधवारी ७० हजार चाचण्यांत फक्त ६३६ रुग्ण आढळले म्हणजे ०.८७% टक्केच नवीन प्रकरणे. म्हणजे संसर्ग फैलावण्याचा दर १% पेक्षा कमी आहे. आठवड्यात अनेक दिवस तर कोरोनामुळे एकही मृत्यू होत नाही. गव्हर्नर अँड्ऱ्यू क्युमो म्हणाले, ‘लोकांचा हा विजय आहे. त्यांनी जीवनशैलीत मोठे बदल केले आहेत.’ या शहराने दोन महिने दररोज सरासरी ७०० पेक्षा जास्त मृत्यू पाहिले आहेत. रुग्णालयांची व्यवस्था कोलमडली होती. स्मशानभूमीतही जागा कमी पडली होती.

न्यूयॉर्कच्या लोकांनी सायकल व ई-स्कूटरचा अंगीकार केला. महामारीदरम्यान ७ लाखांपेक्षा जास्त सायकल सहली केल्या. शहरात सायकलची टंचाई आहे. काहींनी दुप्पट किंमत (४०० ऐवजी ८०० डॉलर) देऊन सायकल खरेदी केली. ब्रुकलिन सायकल कंपनीने सांगितले की, आमच्या शोरूममध्ये सध्या सायकल शिल्लक नाही. त्यांची विक्री हॉट केकप्रमाणे झाली.

फिजिकल डिस्टन्सिंग-मास्क बनली संस्कृती

न्यूयॉर्कने मास्क आणि अंतर ठेवणे ही संस्कृती अंगीकारली. लोक विनाकारण बाहेर निघत नाहीत. संक्रमिताच्या संपर्कात येणाऱ्या ९२ % लोकांना ट्रेस करून चाचण्या केल्या आहेत. ३ पैकी एकाची चाचणी झाली आहे. शाळा उघडण्याची योजना आहे.

घरामागील अंगणात होत आहेत लहान पार्ट्या

भेटीगाठींसाठी, लहान पार्ट्यांसाठी लोकांनी हॉटेल किंवा पार्कमध्ये जाण्याऐवजी आपल्या घरामागील अंगणासच प्राधान्य दिले आहे. जेथे फिजकल डिस्टन्सिंगचे पालन करणे कठीण आहे अशा ठिकाणी ते गेलेच नाहीत.

तिकिटासाठी रांगा नकोेत म्हणून मोफत प्रवास

न्यूयॉर्कचा वाहतूक विभाग काही तासांतच मेट्रो-बस सॅनिटाइझ करत आहे. तिकिटासाठी रांगा लागू नयेत म्हणून सर्वांना मोफत बस प्रवासाची सुविधा सुरू झाली. अर्थात संसर्गाच्या भीतीने लोकांनी मेट्रो आणि बसने प्रवास खूपच कमी केला आहे.

प्रत्येक ठिकाणी चाचणी केंद्र, ७.५ लाख रु. दंड

शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी होत आहे. १४ दिवसांचे क्वॉरंटाइन अनिवार्य आहे. बस, टॅक्सी, विमानतळ या प्रत्येक ठिकाणी चाचणी सुविधा आहे. क्वॉरंटाइनचे नियम मोडल्यावर ७.५ लाख रु. दंड होत आहे.

बातम्या आणखी आहेत...