आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगभरात काेराेना संकट वाढत असतानाच स्वीडनच्या राजकुमारी साेफियादेखील देशातील लाेक व डाॅक्टरांच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत. त्या स्टाॅकहाेमच्या साेफिया हेमेट हाॅस्पिटलमध्ये आराेग्य सहायक म्हणून रुजू झाल्या आहेत. त्यासाठी ३५ वर्षीय साेफिया यांनी तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रमदेखील पूर्ण केला आहे. माझ्या देशात लाेक मृत्युमुखी पडू लागलेले असताना मला महालात आनंदात कसे काय राहता येऊ शकेल? त्यामुळेच मी सर्वांच्या सेवेसाठी कार्यरत झाले आहे, अशी भावना साेफिया यांनी व्यक्त केली आहे. प्रशिक्षणानंतर स्वयंसेवक रूपात काम करण्याची परवानगी मिळाली आहे. त्या या रुग्णालयाच्या मानद अध्यक्षही आहेत. द राॅयल सेंट्रलने दिलेल्या माहितीनुसार, राजकुमारी साेफिया आराेग्य सहायकाच्या रूपाने रुग्णालयात सेवा देत आहेत. काेविड-१९ शी संबंधित रुग्णांवरील उपचारात त्या थेटपणे सहभागी नसतील. त्याएेवजी बिगर-चिकित्सा कार्यात तसेच डाॅक्टर, परिचारिका, मेडिकल स्टाफसारख्या आराेग्यविषयक व्यावसायिकांची मदत करतील. राॅयल काेर्टचे प्रवक्ते म्हणाले, आम्ही माेठ्या संकटात आहाेत. अशी आमची भावना आहे. अशा परिस्थितीत राजकुमारी स्वेच्छेने कार्यकर्त्याच्या रूपाने याेगदान देऊ इच्छितात. प्रिन्सेस साेफिया यांचे रुग्णालयातील पहिल्या दिवशीचे छायाचित्र जाहीर झाले आहे. त्यामध्ये त्या निळ्या रंगाच्या युनिफाॅर्म परिधान केलेल्या व सहकाऱ्यांसाेबत दिसून येतात. कर्तव्य बजावत असतानाच त्यांनी साेशल डिस्टन्सिंगचेही भान बाळगल्याचे लक्षात येते. ३५ वर्षीय साेफिया शाही परिवारात येण्यापूर्वी माॅडेल हाेत्या. त्यांनी २०१५ मध्ये कार्ल फिलिप यांच्याशी विवाह केला. ४० वर्षीय फिलीज राजा कार्ल गुस्ताफ यांचे पुत्र आहेत. त्यांना दाेन मुले आहेत. प्रिन्स अलेक्झांडर व प्रिन्स गेब्रियल अशी त्यांची नावे आहेत. साेफियांनी मुलांना महालात साेडून जनसेवेत स्वत:ला झाेकून दिले आहे.
स्वच्छतेपासून स्वयंपाकापर्यंतची सर्व कामे करणार
साेफिया यांनी केलेला अभ्यासक्रम चिकित्सेइतर पार्श्वभूमी असलेल्या लाेकांना प्रशिक्षित करणारा आहे. त्यात डाॅक्टर, परिचारिका व इतर आराेग्यविषयक देखभाल करणाऱ्या व्यावसायिकांचा ताण कमी करणाऱ्या कामांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याअंतर्गत रुग्णालयात स्वच्छता, स्वयंपाक करणे, उपकरणांना किटाणूरहित करणे इत्यादी कामांचा समावेश आहे. साेफिया हेच काम करणार आहेत. रुग्णालय दर आठवड्याला ८० लाेकांना प्रशिक्षण देत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.