आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेने खुले आव्हान दिले, पण युद्ध करण्याची चीनची हिंमत नाही
अमेरिका ,चीनमध्ये कोण भारी?
अमेरिकेने यावेळी रेड लाइन पार करून चीनला खुले आव्हान दिले आहे. नॅन्सी पेलोसी यांचा दौरा म्हणजे चीनसाठी ललकारी आहे. आता चीन तैवानच्या जलक्षेत्रात भलेही क्षेपणास्त्रे डागत असला तरी तो आपल्याच डावात अडकला आहे. युद्ध पुकारण्यास चीन धजावणार नाही.
युक्रेनसारखे युद्ध लादेल? युक्रेन व रशियाची परिस्थिती खूप वेगळी आहे. तैवानवर असाच प्रहार करणे चीनला जमणार नाही. तैवानमध्ये चीनला एम्फिबियस युद्ध करावे लागेल. परंतु ते देखील चीनसाठी अशक्य दिसते.
तर अमेरिका तैवानला मदत करेल? अमेरिकेने १९७९ मध्ये तैवानशी एक करार केला होता. त्यानुसार हल्ला झाल्यास अमेरिकन प्रशासन थेट हस्तक्षेप करू शकेल.
चिनी राष्ट्रपतींसाठी युद्धास सुरुवात करणे सोपे ठरेल? नाही. ऑक्टोबरमध्ये चिनी नॅशनल पीपल्स काँग्रेसची बैठक होणार आहे. युद्ध सुरू केल्यानंतर त्याचे कोणतेही विपरीत परिणाम जिनपिंग यांच्या दावेदारीला मारक ठरू शकतात.
हल्ला केल्यास चीनला काही परिणाम भोगावे लागू शकतात? वन चायना पॉलिसीनुसार चीन तैवानला आपला भाग मानते. मग आपल्याच भागावर युद्ध कसे करणार? तैवानच्या विरोधात युद्ध केल्यास आर्थिकदृष्ट्या दहा वर्षे मागे पडेल.
मुकेश कौशिक यांच्याशी केलेल्या चर्चेवर आधारित
एसएल नरसिम्हन, ले.ज. (रि.), बीजिंगमध्ये माजी भारतीय मुत्सद्दी
तैवानचे नागरिक मुळीच घाबरलेले नाहीत, दैनंदिन कामात व्यग्र
तैवानची सद्य:स्थिती कशी आहे?
चीनने क्षेपणास्त्र डागली तरी तैवानचा सामान्य नागरिक मुळीच धास्तावलेला वगैरे नाही. तो शांत आहे. चीनने डागलेल्या क्षेपणास्त्रांच्या धुराला पाहून देखील लोक घाबरलेले नाहीत. ते पूर्वीप्रमाणेच आपल्या दैनंदिन कामात व्यग्र दिसून येतात. बाजारपेठा फुललेल्या दिसतात.
युद्धाची शक्यता वाटते? तैवान एक बेट आहे. त्यावर आक्रमण करण्यासाठी चीनला सुमारे एक लाख सैनिक पाठवावे लागतील. एवढे लोक पाठवण्यासाठी चीनला ३-४ पट लोक आणि यंत्रणाही लागेल. म्हणूनच चीन ते करणार नाही.
प्रतिकारानुसार परिणाम काय ? चीनने गोंधळातच क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यातून त्यांचे नुकसान झाले. ही क्षेपणास्त्रे जपानच्या सागरी क्षेत्रात काेसळली. त्यामुळे चीनने जपानशी देखील पंगा घेतला आहे. जपानने आपल्या नेत्यांना चीनमध्ये पाठवल्यास चीनचे उरले-सुरले ढोंगही चव्हाट्यावर येईल.
युद्ध झाल्यास आर्थिक आघाडीवर काय परिणाम होईल? खरे तर जिनपिंग युद्ध करण्याच्या भूमिकेत नाहीत. २०११ मध्ये तैवानची एकूण परकीय गुंतवणूक ८० टक्के चीनमध्ये होती. परंतु ती आता ३० टक्क्यांवर आली. सेमीकंडक्टर क्षेत्रही जपान व अमेरिकेत केंद्रित होत आहे. तैवानने चीनमधील गुंतवणूक कमी करून जपान, व्हिएतनाम, थायलंड, भारतात करण्यास सुरुवात केली. रितेश शुक्ल यांच्याशी केलेल्या चर्चेवर आधारित
थंग हांग लिन, तैवानच्या सोशियालॉजी इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.