आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना संकट:काेराेना संसर्ग जागेला स्पर्श केल्यास पाॅझिटिव्ह हाेण्याचा किती धाेका ?

तारा पार्कर-पाेप2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विषाणू पृष्ठभागाहून काही तासांतच विघटित हाेऊन नंतर संसर्ग पसरत नाही
  • हात धुऊन संसर्गाची साखळी ताेडणे सर्वात चांगले

संसर्ग झालेल्या पृष्ठभागाला स्पर्श केल्याने काेराेना व्हायरस हाेण्याच्या भीतीमुळे अापण गेल्या काही महिन्यांपासून भाज्या धुऊन घेत आहाेत, पाकीट आणल्यास ते काही काळ असेच साेडून देताे आणि लिफ्टचे बटण दाबताच काहीसे घाबरायला हाेते. परतु संसर्ग झालेली जागा वा वस्तूमुळे काेविड - १९ हाेण्याची जाेखीम किती आहे?  राेग नियंत्रण अाणि प्रतिबंध केंद्राने अलीकडेच पृष्ठभागामुळे संसर्गाचा फैलाव हाेण्याचा आपला इशारा काहीसा शिथिल केला हाेता. त्यांच्या मते पृष्ठभागामुळे संसर्ग हाेण्याचा धाेका नाही. पण  त्यानंतर तत्काळ या केंद्राने संसर्गग्रस्त पृष्ठभागाशी अप्रत्यक्ष संपर्क (फाेमाइट ट्रान्समिशन) झाल्यास काेविड-१९ हाेण्याचा धाेका असताे असे स्पष्ट केले. युनिव्हर्सिटी अाॅफ मॅसाच्युसेट‌्सच्या कंपॅरेटिव्ह इम्युनाॅलाॅजिस्ट एरिन ब्राेमेज म्हणाले,  दरवाजाच्या कड्या, लिफ्टची बटणे वा रेलिंगसारखा पृष्ठभाग संक्रमणाचा फैलाव करणारे मुख्य वाहक नाहीत. नंतर चेहऱ्याला स्पर्श झाल्यास कठीण परिस्थिती निर्माण हाेऊ शकते. संसर्गग्रस्त व्यक्ती हात ठेवून खाेकली व त्याच हाताने तुमचा हात हातात घेतला व त्याच हाताने डाेळे चाेळले तर संसर्ग हाेऊ शकताे. जर काेणी ग्लासने पाणी पीत असेल व ताेच ग्लास हातात पकडला व नंतर तेच हात डाेळे, ताेंडाला लावला तर तुम्हाला संसर्ग हाेऊ शकताे. अप्रत्यक्ष फैलाव याच पद्धतीने हाेताे. प्लास्टिक आणि स्टीलवर विषाणू ३ दिवस राहताे. परंतु पृष्ठ भागावर आल्यानंतर ताे काही तासांतच विघटित हाेऊ लागताे. म्हणजे शिंकण्यातल्या थेंबातून काही काळ संसर्ग पसरू शकताे, पण काही दिवसांपर्यंत नाही असे संशाेधन सांगते. काेलंबिया विद्यपीठाचे डाॅ. डॅनियल वाइनस्टकी म्हणाले. ट्रान्समिशनसाठीच नाही तर व्यक्ती - व्यक्तीतील फैलावासाठीदेखील हात धुणे गरजेचे आहे.

हात धुऊन संसर्गाची साखळी ताेडणे सर्वात चांगले

पृष्ठभागावरील विषाणूचा संसर्ग हाेण्यासाठी पुरेशा प्रमाणात विषाणू हाताला लागणे गरजेचे अाहे.नंतर तुम्ही, डाेळे, नाक वा ताेंडाला स्पर्श केला. हे वारंवार हाेत राहिले तर तुम्ही अाजारी पडू शकता. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या इन्फेक्शियस डिसीज इपिडेमियाॅलाॅजिस्ट ज्युलिया मार्क्स म्हणkmdukकिराणा, मेल, डबा वा काेणत्याही प्रकारच्या पृष्ठभागावरून संक्रमण हाेण्यासाठी दीर्घ साखळीची गरज अाहे. अापले हात धुऊन ही साखळी ताेडणे हाच चांगला उपाय अाहे.

0