आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन ऑइल कॉर्पोरेशननंतर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. नेही (एचपीसीएल)रशियाकडून २० लाख बॅरल स्वस्त क्रूड ऑइल (कच्चे तेल) खरेदी केले आहे.
सूत्रांनी सांगितले की, आयओसीप्रमाणेच एचपीसीएलनेही युरोपियन व्यावसायिक व्हेटोल यांच्यामार्फत रशियन युराल्स क्रूडची खरेदी केली आहे. याशिवाय मंगळूरची रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लि. (एमआरपीएल) या कंपनीनेही १० लाख बॅरल कच्चे तेल खरेदीची निविदा दिली आहे. युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यामुळे पश्चिमेकडील देशांच्या निर्बंधामुळे अनेक कंपन्या आणि देश रशियाकडून तेल खरेदी टाळत आहेत. यामुळे रशियन कच्च्या तेलाचे दर घसरले असून ते बाजारात मोठ्या सुटीसह उपलब्ध आहे. याचा लाभ घेण्याच्या उद्देशाने भारतीय रिफायनरी कंपन्यांनी क्रूड खरेदीच्या निविदा जाहीर केल्या आहेत. आयओसीने मागील आठवड्यात व्हिटोलकडून रशियन कच्चे तेल खरेदी केले. कंपन्यांना ते २० ते २५ डॉलर प्रतिबॅरल स्वस्त मिळाले आहे. एचपीसीएलने याच आठवड्यात २० लाख बॅरल क्रूड खरेदी केले. तथापि, जगातील सर्वात मोठी रिफायनरी चालवणारी रिलायन्स इंडस्ट्रीज रशियन इंधन खरेदी टाळू शकते. वास्तविक कंपनीची अमेरिकेत गुंतवणूक आहे. त्यामुळे अमेरिकेने रशियावर लावलेल्या निर्बंधांमुळे रिलायन्सच्या व्यापारावर परिणाम होऊ शकतो. शिवाय रशियाकडून तेल खरेदी केल्यास अमेरिका नाराज होण्याची भीती रिलायन्सला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.