आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयाॅर्क:अमेरिकेमध्ये कर्मचाऱ्यांचा प्रचंड तुटवडा; किशोरवयीन मुलांची कंपन्यांमध्ये भरती

न्यूयाॅर्क13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील फूड चेन कंपनी मॅकडाेनाल्डला ४० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी कंपनीने आेरेगन येथील फ्रँचायझीने १४ ते १५ वर्षीय मुलांची भरती सुरू केली आहे. त्यासाठी कंपनीने रेस्तराँच्या बाहेर जाहिरातीचे बॅनरही लावले आहेत. ही नियुक्ती प्रक्रिया श्रम कायद्यांतर्गत राबवली जात आहे. कंपनीच्या फ्रँचायझी मेडफाेर्ड रेस्तराँचे संचालक हीथर कॅनेडी म्हणाले, अशा प्रकारची परिस्थिती कधीही पाहिली नाही. आम्ही कर्मचाऱ्यांना ताशी १५ डाॅलर (सुमारे ११०० रुपये) व दर आठवड्याला २२ हजार रुपयांचा बाेनसही देत आहाेत. एवढी सुविधा देऊनही लाेक त्यात रस दाखवत नाहीत. कॅनेडी म्हणाले, १६ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या भरतीसाठी आतापर्यंत २५ अर्ज मिळाले आहेत. अमेरिकेतील आपल्या रेस्तराँतील कामगारांना किमान वेतन ताशी ११०० रुपये दिले जातील.

अमेरिकेत ११ लाखांहून जास्त नाेकऱ्या
देशात माेठ्या प्रमाणात नाेकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. आधी ५.९० लाख नाेकऱ्या हाेत्या. आता ११ लाख रिक्त आहेत. ही संख्या विक्रमी मानली जाते. कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत असलेली मॅकडाेनाल्ड देशातील पहिली कंपनी नाही. बर्गर किंग, फूड चेन वँडी, टॅक्सान चेन लायने चिकन फिंगरलाही पुरेशा प्रमाणात कर्मचारी मिळत नाहीत. किशाेरवयीन मुलांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रस्ताव दिले आहेत. साेबतच ठिकठिकाणी हाेर्डिंग्जही लावलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...