आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हास्यविनोदामुळे आपली रोगप्रतिकारक्षमता, ऊर्जा, मेंदूची शक्ती वाढते; लाफ्टर, कॉॅमेडी शो पाहा

वॉशिंग्टन25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हसणे आरोग्यासाठी चांगले असते हे आपण नेहमीच एेकतो. दैनंदिन जीवनात हास्यामुळे आनंद वाढतो. त्याशिवाय हसत राहिल्याने ऊर्जा व बुद्धीची शक्तीही वाढते. यातून तणाव कमी होतो. इम्युनिटी वाढणे आणि मूड सुधारण्यासही मदत होते. पेपरडाइन युनिव्हर्सिटीमध्ये क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. स्टीव्हन सल्टेनॉफ ४० वर्षांपासून ह्यूमर पॉवरच्या साह्याने लोकांना मदत करत आहेत. राेजच्या जगण्यात हास्य कसे वाढवता येईल, हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया....

हास्याचे कारण शोधा : मनोचिकित्सक व स्टँडअप कॉमेडियन केट निकोल्स म्हणाल्या, तुम्हाला कोणत्या गोष्टींमुळे जास्त हसू येते हे शोधून काढा. लाफ्टर शोमध्ये जा, हसवणाऱ्या लोकांच्या सहवासात जा किंवा पसंतीचा कॉमेडी शो पाहा. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरील हास्याच्या मीम्स व व्हिडिआेला सेव्ह करा आणि गरज भासेल तेव्हा तो पाहा.
मजेशीर प्रसंग पुन्हा जगा : निराश असताना डोळ्यात पाणी येईपर्यंत हसवणाऱ्या क्षणांना पुन्हा आठवा. डॉ. सल्टेनॉफ म्हणाले, हसवणाऱ्या क्षणांची कल्पना मेडिटेशनसारखी असते. यातून तुमचा मूड चांगला होतो.

दिवसभरात एक मजेशीर गोष्ट करा : हास्यासंबंधी गोष्टी बघायचे असे ठरवा. ‘द हीलिंग पॉवर ऑफ ह्यूमर’चे लेखक अॅलन क्लेन म्हणाले, चेहऱ्यांवर हास्य खुलवणारी एक गोष्ट दिवसभरात जरूर करायची आहे. असे दररोज सकाळी ठरवा. यातून अनपेक्षित ठिकाणांहून हास्य नक्की मिळेल. तुम्ही जास्त हसू लागाल. कॉमेडी क्लास लावणेही फायद्याचे ठरू शकते. काॅमेडियन निकोल म्हणाल्या, भलेही तुम्ही स्वत:ला विनोदी मानत नसले तरी बदलाच्या दिशेने पाऊल पडू शकते. निकोलने महाविद्यालयीन जीवनात कंटाळवाणेपणा दूर करण्यासाठी क्लास सुरू केला होता. आज जगभरात त्यांचे कार्यक्रम होतात.

लहानसहान विनोद करा : अनेकांना इतरांना हसवणे आवडते. हे करण्यासाठी महान हास्य कुशलतेची गरज नसते. डॉ. सल्टेनॉफ म्हणाल्या, मी लोकांना सरळ व चांगला विनोद शिका तो लांब नसावा. त्याचा अभ्यास करा.

स्वत:वर अतिरिक्त दबाव टाकू नका, विपरीत परिणाम होऊ शकतो : विनोदवीर
विनोदी होण्याचा प्रयत्न तुमच्यावर विपरीत परिणाम करू शकतो. त्यासाठी स्वत:वर खूप दबाव टाकू नका. निकोलस म्हणाल्या, तुम्ही नियमितपणे स्वत: विनोदी गोष्टींच्या संपर्कात येत असल्यास तुम्ही मेंदूच्या विशिष्ट भागाला जागृत करण्यात यशस्वी झालेला असाल. हे अगदी व्यायाम करण्यासारखे आहे. उदाहरणार्थ तुम्ही मसलवर लक्ष केंद्रित केल्यास ते बळकट होऊ लागतात. आपल्या सेन्स ऑफ ह्यूमरबद्दलही असा विचार करायला हवा.