आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका:ग्रँड कॅन्यनच्या हॉटेलची शंभरी, आजही लोक पायी जातात

नील किंग, न्यूयॉर्क22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील अॅरिझोना येथील ग्रँड कॅन्यनच्या डोंगराळ भागात दुर्गम ठिकाणी फँटम रँच हॉटेलला १०० वर्षे पूर्ण झाली. या भागातून कोलोराडो नदी वाहते. हे ठिकाण हॉटेल ब्राइट एंजल क्रीक व नदीच्या संगमापासून एक किमी अंतरावर आहे. हे हॉटेल १९२२ मध्ये सुरू झाले होते. ते ऐतिहासिकदृष्ट्या संरक्षित श्रेणीत समाविष्ट आहे. त्यामुळे ४४० चौरस किमी एवढे क्षेत्रफळ असलेल्या ग्रँड कॅन्यनमध्ये भटकंती करताना लोक आजही हॉटेलपर्यंत पायी जातात. येथे स्टोअरपासून पोस्ट ऑफिसपर्यंतची सुविधा आहे. हे हॉटेल येथे आढळणाऱ्या भुरकट रंगाच्या विशिष्ट दगडांपासून बांधण्यात आलेले आहे.

4 किमी पायी चालून हॉटेलपर्यंत जावे लागते. हा मार्ग दुर्गम आहे. 100 जणांच्या निवासाची व्यवस्थाही १०० वर्षांपूर्वीची.

बातम्या आणखी आहेत...