आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Hundreds Of Tons Of Trash, Military Boots Of Soldiers Returning To America; Crowds Flocked To Afghanistan To Get Supplies; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:अमेरिकेत परतणाऱ्या सैनिकांचा शेकडो टन कचरा, लष्करी बूट; सामान मिळवण्यासाठी अफगाणमध्ये लोकांची गर्दी उसळली

काबूलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अफगाणिस्तानमधील प्रमुख छावणी बगरामला सैनिकांचा 20 वर्षांनंतर निरोप

अमेरिकी सैनिक अफगाणिस्तानातून मायदेशी परतू लागले आहेत. अमेरिकी सैनिकांनी शुक्रवारी अफगाणिस्तानातील प्रमुख लष्करी तळ बगरामचाही निराेप घेतला. ९/११ नंतर तालिबानला देशातून बाहेर काढण्यासाठी आणि अल-कायदाच्या दहशतवाद्यांना शिकार करण्यासाठी २० वर्षापर्यंत बगराम हवाई तळाला लष्कराचा प्रमुख केंद्र करण्यात आले हाेते. बगरामपासून अमेरिकी सैनिक परतू लागले आहेत. परंतु त्यांनी जाताना शेकडाे टन कचरा मागे साेडला आहे. त्याबाबत अफगाणचे अधिकारी म्हणाले, अमेरिकी सैनिकांजवळील सामान ते स्वत: साेबत घेऊन जातील किंवा येथेच आम्हाला देऊन जाऊ शकतात.

एवढे वाटप करूनही खूप सामग्री शिल्लक राहणार आहे. त्यात बहुतांश इलेक्ट्राॅनिक कचरा आहे. वीस वर्षांपासून राहणाऱ्या सैनिकांनी या वस्तूंचा वापर केला आहे. त्याची सफाई करण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागू शकताे. बगराममध्ये कचरा असलेल्या भागात लाेकांची गर्दी दिसते. त्यात काही कामाच्या किंवा चांगल्या स्थितीमधील वस्तू सापडतील, या आशेवर लाेक आले हाेते. काही लाेकांना कामाच्या वस्तू मिळाल्या. त्यात बूट, रेडिआे, लाेखंडी सामान, महागडे धातू इत्यादी. काही संग्राह्य वस्तूही लाेकांना सापडल्या. त्या आठवण म्हणून जपण्यासाठी देखील लाेकांनी जमवल्या.

हिंदूकुश पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेले बगराम एेतिहासिक लष्करी तळ आहे. १९७९ मध्ये साेव्हिएत संघाचे सैन्य अफगाणिस्तानात आले हाेते. तेव्हाही याच भागात लष्करी तळ करण्यात आला हाेता. परंतु आता अमेरिकी निघून गेल्यानंतर तालिबान पुन्हा वर्चस्व करणार तर नाही, याची भीती सामान्य लाेकांमध्ये दिसते. तालिबानने अफगाणिस्तानच्या राज्यांच्या राजधानीजवळील शहरांवर वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

११ सप्टेंबरपर्यंत पूर्ण सैन्य परतणार, लष्कराची यादी सुरू
अमेरिकेने एक मेपासून सैन्य माघारीचा निर्णय लागू करण्याचे ठरवले हाेते. संपूर्ण सैन्य ११ सप्टेंबर २०२१ पर्यंत परतणार आहे. याच दिवशी वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये झालेल्या हल्ल्यास २० वर्षे हाेतील. अफगाणिस्तानात २५०० हून जास्त अमेरिकी व नाटाे देशांचे ७ हजार सैनिक तैनात आहेत.

बातम्या आणखी आहेत...