आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार महिन्यांत बदलले चित्र:तालिबानने खाण्यापिण्याची रसद तोडल्यानेभुकेने व्याकूळ अफगाणी सैनिकांची शरणागती

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अफगाणिस्तान सैन्याच्या सज्जतेसाठी अमेरिकेने खर्च केलेले ६.२५ लाख कोटी पाण्यात

अफगाणिस्तानच्या शहरांवर तालिबान वेगाने वर्चस्व मिळवत आहे. तालिबानचे दहशतवादी काबूलपासून ११ किमीवर आहेत. सुरक्षा दलांनी शरणागती पत्करल्याने हेलिकॉप्टर, अमेरिकेने दिलेली कोट्यवधी रुपयांची उपकरणे इत्यादींवर तालिबानने वर्चस्व मिळवले आहे. तालिबान चाल करून पुढे जात असल्याने अफगाणिस्तानच्या सैन्याला युद्धासाठी सज्ज करण्याचे अमेरिकेचे प्रयत्न धुळीस मिळत आहेत.

२० वर्षांत अमेरिकेने अफगाण सुरक्षा दलासाठी शस्त्रे, सैन्य उपकरण, प्रशिक्षणावर केलेली सुमारे ६.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व्यर्थ जात असल्याचे चित्र आहे. अफगाण सैन्याचे पतन एक आठवड्यापूर्वी नव्हे तर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सैन्याला ११ सप्टेंबरला परत बोलावल्यापासून सुरू झाले होते. तालिबानने मे महिन्यापासून वर्चस्व करण्यास सुरुवात केली होती. हवाईमार्गे भोजनाची व्यवस्था होणे अशक्य असल्याची कल्पना तालिबानला होती. म्हणूनच या दहशतवादी संघटनेने रस्त्याने येणाऱ्या सैन्याच्या भोजनाची रसद लुटली. त्यावर ताबा घेण्यास सुरुवात केली. ही रसद बंद झाल्याने ग्रामीण चौकीवर तैनात सैनिक, पोलिसांनी शरणागती पत्करली. त्यांची उपासमारी वाढली. त्यामुळे चौकीवरील दारूगोळा तसेच युद्धाचे साहित्य तालिबानला सहज मिळाले. आता त्याचा वापर अफगाणच्या सैनिकांवरच करण्याचे काम सुरू झाले आहे. अफगाण सैन्यातील एकूण सैनिकांची संख्या ३ लाखांवर होती. आज ती ५० हजारांवर येऊन ठेपल्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

तालिबानचे सरकार चीन स्वीकारण्याच्या तयारीत
चीन अफगाणिस्तानात तालिबानी सरकारला स्वीकारण्याच्या दिशेने आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ली यी यांचे तालिबान अधिकाऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून असलेले छायाचित्र त्याबद्दलचे संकेत देणारे आहे. अफगाणिस्तानात झपाट्याने बदलणारे चित्र लक्षात घेऊन तालिबानला मान्यता देण्याची तयारी चीनने केल्याचे मानले जाते. तालिबानला नाकारून चालणार नाही. कारण तालिबानचा अफगाणिस्तानात प्रभाव राहणार याची चीनच्या परराष्ट्रतज्ज्ञांना कल्पना आहे. त्यामुळे चीन तालिबान स्वीकारण्याच्या तयारीत आहे.अमेरिका किंवा रशियाच्या तुलनेत चीनला एका गोष्टीचा फायदा आहे. त्यांचा तालिबानशी संघर्ष नाही.

अफगाणी-पाक सैन्य दलात धुमश्चक्री सुरू
तालिबानने सीमा बंद केल्यानंतर अफगाणिस्तानी नागरिक सीमा आेलांडून पाकिस्तानच्या दिशेने जात आहेत. त्यांना पाकिस्तानच्या सैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. कारण पाकने ६ ऑगस्ट रोजी व्हिसा फ्री एन्ट्रीवर बंदी घातली होती. रोखल्यामुळे नाराज अफगाणिस्तानी नागरिक व पाकिस्तानी सैनिक यांच्यात संघर्ष दिसून येत आहे. घटना चमन स्पिन बोल्दकची आहे. त्यात एका ५६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. संघर्षाची स्थिती पाहता सैन्याची तैनाती वाढवण्यात आली. अफगाणी नागरिकांना सीमा पार करू द्यावी, अशी मागणी तालिबान करत आहे. त्यांना स्थलांतरित म्हणून वागणूक मिळावी.

तालिबानी सरकारला स्वीकारण्याची नागरिकांची तयारी :दैनंदिन वस्तूंची जमवाजमव, बुरखा खरेदीवर भर

राजधानी काबूलजवळील असयाब शहरापर्यंत पाेहोचल्याबरोबर अफगाणिस्तानच्या नागरिकांच्या भावना लक्षात येऊ लागल्या. तालिबानचे देशावर शासन येणार असल्याचे नागरिकांना वाटते. लोकांनीही आता तालिबानच्या कायद्यानुसार स्वत:ला ढाळण्याची तयारी सुरू केली आहे. नागरिक घरात डाळ-तांदूळ, भाज्यांसह इतर सामान जमवू लागले आहेत. अनेकांनी बुरखा खरेदी करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी शहरात इतर नातेवाइकांसह राहण्यासाठी घर सोडले आहे. बाॅम्बस्फोटापासून वाचवण्यासाठी लोक सुरक्षित निवारा शोधत आहेत. काही लोक आपल्या घरांच्या दरवाजाला मजबूत करत आहेत. हल्ल्यात ते तुटू नयेत, असा त्यामागील उद्देश. काहींनी तळघराला लुडोसारखे बनवण्यास सुरुवात केली. तालिबानच्या चढाईच्या वार्ता लोक फेसबुकमधून शोधू लागली आहेत. कंदहारमध्ये पश्तून समूहाचे वर्चस्व आहे. यातूनच तालिबानचा उदय झाला होता. शिक्षणाची आवड असलेले कंदहारचे सेवानिवृत्त शिक्षक अब्दुल यांनी आता पुस्तकांना दडवून ठेवण्याचे ठरवले आहे. तालिबान सत्तेवर येताच सूड घ्यायला सुरुवात करतील, अशी धास्ती अब्दुल यांना वाटते. कंदहारमध्ये ग्रंथालय नाही. पुस्तकांची अदलाबदल करणाऱ्या बुक क्लबचे अब्दुल सदस्य आहेत. ते म्हणाले, माझी रात्रीची झोप उडाली आहे. तालिबानने कंदहारमध्ये माझ्या घराची झडती घ्यावी असे मला वाटत नाही.

बातम्या आणखी आहेत...