आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेला आणखी एका चक्रीवादळाने तडाखा दिला आहे. दक्षिण मध्य प्रांत टेक्सास व ओक्लाहोमामध्ये गुरुवारी हे वादळ धडकले. ओक्लाहोमाच्या सोमिनोलमध्ये वाऱ्याचा वेग ताशी २१७ किमी असा होता. त्याचा फटका शाळांसह इतर इमारतींनाही बसला. पिकांचेही नुकसान झाले. त्यामुळे हजारो घरांतील वीजपुरवठा खंडित झाला. गॅसपुरवठाही बंद पडला होता. ओक्लाहोमाच्या बिक्सबायमध्ये तर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पूरस्थिती पाहायला मिळाली. या भागातील २०० हून जास्त नागरिकांना जीव मुठीत घेऊन चर्चमध्ये आश्रयाला जावे लागले. टेक्सासमध्ये गुरुवारी रस्क काैंटीमध्ये आलेल्या वादळाचा वेग ताशी २७५ किमी नोंदवण्यात आला. वॉशिंग्टन कौंटीमध्ये पुरात अडकलेल्या ३० जणांना वाचवण्यात आले.
कन्सासमध्ये धडकले होते वादळ
चार दिवसांपूर्वी कन्सासमध्ये भीषण वादळ धडकले होते. त्या वादळाचे व्हिडिओ फुटेज समोर आले आहे. वादळात अनेक घरांचे नुकसान झाले होते. हवामान तज्ञ रीड टिम्मर यांनी हे छायाचित्र सोशल मीडियातून शेयर केले होते. या वादळामुळे १५ हजारांहून जास्त लोकांना फटका बसला.
566 वादळ यंदा धडकली अमेरिकेत. ४८७ मध्ये ताशी वेग १५० किमी राहिला. वादळात १३ जणांनी प्राण गमावले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.