आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Hurricane Ian Devastates Florida Updates । 2 Dead, 250 KmPH Winds, Shark Seen On Roads, 23 Missing After Boat Sinks

फ्लोरिडात इयान चक्रीवादळामुळे विध्वंस, 2 ठार:250 KmPH वेगाने वाहताहेत वारे, रस्त्यांवर दिसली शार्क, बोट बुडून 23 जण बेपत्ता

फ्लोरिडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इयान चक्रीवादळाने अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये कहर केला आहे. नॅशनल हरिकेन सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ फ्लोरिडाच्या दक्षिण पश्चिम किनारपट्टीला धडकले. फोर्ट मायर्स शहराला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे जोरदार वारा वाहत असून पाऊस पडत आहे. दरम्यान, वार्तांकन करणारा एक रिपोर्टर धडपडताना दिसला. वादळामुळे परिस्थिती एवढी भीषण बनली आहे की, रस्त्यावर शार्क मासेही दिसत होते.

सोशल मीडियावर वादळाशी संबंधित अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये, जिम कॅंटर नावाचा रिपोर्टर फोर्ट मायर्स शहरातील स्थितीबद्दल वार्तांकन करत होता. दरम्यान, वाऱ्याच्या वेगामुळे जिम यांचा तोल गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ते धडपडले. ते म्हणाले- मला उभे राहता येत नाही. वारा खूप जोराचा आहे. ते काही क्षण खांबाला धरून उभे होते. फोर्ट मायर्स शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक शार्क दिसून आला.

फोर्ट मायर्स शहरात पावसानंतर पाण्याची पातळी वाढली. अशा स्थितीत येथील रस्त्यावर एक शार्क मासाही दिसला.
फोर्ट मायर्स शहरात पावसानंतर पाण्याची पातळी वाढली. अशा स्थितीत येथील रस्त्यावर एक शार्क मासाही दिसला.

बोटीतील 23 प्रवासी बेपत्ता

वृत्तानुसार, किनारपट्टी भागात 2 ते 7 मीटर उंच लाटा उसळत आहेत. स्टॉक बेटावर जोरदार लाटांमध्ये एक बोट बुडाली आहे. 23 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. या बोटीवर क्यूबन प्रवासी होते. यूएस कोस्ट गार्ड बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे.

मुख्य गस्ती अधिकारी वॉल्टर श्लोसर म्हणाले - चक्रीवादळामुळे बोट बुडाल्यानंतर 3 क्यूबन स्थलांतरित पोहत किनाऱ्यावर आले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतरांचा आम्ही शोध घेत आहोत. कॅटेगरी 4चे हे वादळ 27 सप्टेंबर रोजी क्युबाच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकले. यानंतर ते फ्लोरिडा राज्याकडे वळले.

व्हेनिस, फ्लोरिडा येथील रॉबर्ट्स बेजवळ पार्क केलेल्या अनेक नौका बुडाल्या.
व्हेनिस, फ्लोरिडा येथील रॉबर्ट्स बेजवळ पार्क केलेल्या अनेक नौका बुडाल्या.

25 लाख लोक प्रभावित

एका अधिकाऱ्याने सांगितले- या कॅटेगरी 4च्या वादळामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस होऊ शकतो. कॅरिबियन समुद्रातून निर्माण झालेल्या इयान वादळाने यापूर्वी क्युबामध्ये भयंकर विध्वंस घडवून आणला आहे. हे वादळ 27 सप्टेंबर रोजी क्युबाच्या पश्चिम किनार्‍यावर धडकले. येथे 205 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. परंतु फ्लोरिडामध्ये 1921 मधील टार्पोन स्प्रिंग्स चक्रीवादळापेक्षा अधिक विनाश घडवू शकते. येथे 250 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. धोका लक्षात घेता साडेआठ लाख घरांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. सुमारे 20 लाख लोकांना याचा फटका बसला आहे.

सरकारने खबरदारीच्या उपाययोजना केल्या

अमेरिकन सरकारने फ्लोरिडामध्ये आठवडाभराची आणीबाणी जाहीर केली आहे. जवळपास 25 लाख लोकांना घरे रिकामी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे वादळ धोकादायक रूप धारण करत आहे. जॉर्जिया आणि दक्षिण कॅरोलिनामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

टाम्पा आणि ओरलॅंडोला जाणारी सर्व उड्डाणे निलंबित करण्यात आली आहेत. फ्लोरिडामध्ये 3,200 राष्ट्रीय सुरक्षा दलाचे रक्षक आधीच तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय 1,800 इतर रक्षकांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. याशिवाय मदत आणि सुरक्षा यंत्रणांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

फोर्ट मायर्स शहरात मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
फोर्ट मायर्स शहरात मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
फोर्ट मायर्स शहराला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथील अनेक भागांत दोन ते चार फूट पाणी साचले होते.
फोर्ट मायर्स शहराला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथील अनेक भागांत दोन ते चार फूट पाणी साचले होते.
फोर्ट मायर्स शहरात जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. त्यामुळे घरांचे व वाहनांचे मोठे नुकसान झाले.
फोर्ट मायर्स शहरात जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. त्यामुळे घरांचे व वाहनांचे मोठे नुकसान झाले.
टाम्पा शहरात मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाल्याच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
टाम्पा शहरात मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाल्याच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
हा फोटो पेमब्रोक पाइन्स शहरातील नॉर्थ पेरी विमानतळाचा आहे. येथे जोरदार वाऱ्यामुळे दोन विमाने उलटली.
हा फोटो पेमब्रोक पाइन्स शहरातील नॉर्थ पेरी विमानतळाचा आहे. येथे जोरदार वाऱ्यामुळे दोन विमाने उलटली.
फ्लोरिडाच्या डेव्ही भागात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे घरे उद्ध्वस्त झाली. स्थानिक त्यांच्या घराची दुरुस्ती करताना दिसत आहेत.
फ्लोरिडाच्या डेव्ही भागात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे घरे उद्ध्वस्त झाली. स्थानिक त्यांच्या घराची दुरुस्ती करताना दिसत आहेत.
मुसळधार पावसामुळे फोर्ट मायर्स शहरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. अंधारामुळे कारचा अपघात झाला.
मुसळधार पावसामुळे फोर्ट मायर्स शहरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. अंधारामुळे कारचा अपघात झाला.

हवामान बदल कारणीभूत

नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीतील अॅटमॉस्फिअरिक सायन्सचे प्राध्यापक गॅरी लॅकमन म्हणतात की, संपूर्ण जग सध्या हवामान बदलाच्या तडाख्याला तोंड देत आहे. त्यामुळे भीषण वादळ आणि अत्यंत खराब हवामानाच्या घटना समोर येत आहेत. हवामान बदलामुळे काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ही अतिशय धोकादायक चिन्हे आहेत.

यूएस नॅशनल हरिकेन सेंटरच्या मते, इयान श्रेणी 4 मध्ये येणारे हे 17 वर्षांतील तिसरे सर्वात धोकादायक वादळ आहे. याआधी 2018 मध्ये मायकेल चक्रीवादळाने भयंकर विध्वंस घडवून आणला होता.
यूएस नॅशनल हरिकेन सेंटरच्या मते, इयान श्रेणी 4 मध्ये येणारे हे 17 वर्षांतील तिसरे सर्वात धोकादायक वादळ आहे. याआधी 2018 मध्ये मायकेल चक्रीवादळाने भयंकर विध्वंस घडवून आणला होता.

कॅनडात फियोना चक्रीवादळाने केला कहर

फियोना चक्रीवादळाने गेल्या आठवड्यात कॅनडात कहर केला होता. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला होता. पाच राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी ताशी 160 किमी वेगाने वारे वाहत होते. तसेच अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळ ओसरल्यानंतरही येथील परिस्थिती सध्या ठीक नाही. लोकांना वीज आणि अन्नाशिवाय राहावे लागत आहे.

फियोनाने कॅनडाच्या अटलांटिक कोस्टवरील अनेक घरांना ढिगाऱ्यात रूपांतरित केले आहे.
फियोनाने कॅनडाच्या अटलांटिक कोस्टवरील अनेक घरांना ढिगाऱ्यात रूपांतरित केले आहे.
बातम्या आणखी आहेत...