आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • I Am Responsible For The Divorce, My Own Fault; Bill Gates Was Born In Sunville Passionate; News And Live Updates

घटस्फोट प्रकरण:​​​​​​​घटस्फोटासाठी मी स्वत: जबाबदार, चूक माझीच; बिल गेट्स सनव्हॅलीत झाले होते भावुक!; मायक्रोसॉफ्टच्या सहसंस्थापकांची चुकीची कबुली

न्यूयॉर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सनव्हॅली समर कॅम्पमध्ये घेतली जबाबदारी

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स इदाहो (अमेरिका) येथे दोन दिवसांपूर्वी सनव्हॅलीतील संमेलनात सहभागी होऊन परतले आहेत. या समर कॅम्पमध्ये त्यांच्याव्यतिरिक्त वॉरेन बफे, जेफ बेजोस, मार्क झुकेरबर्गसह जगातील अनेक दिग्गज उद्योजकांची उपस्थिती होती. गेट्स यांनी खासगी जीवनातील अनुभव शेअर केले. घटस्फोटासाठी मी स्वत: जबाबदार आहे. त्यात चूक केवळ माझी आहे, असे त्यांनी कबूल केले.

गेट्स यांनी अलीकडेच मेलिंडा गेट्स यांच्याशी २७ वर्षांचा संसार संपवत असल्याचे जाहीर केले होते.संमेलनस्थळी रिसोर्टमधील प्रत्यक्षदर्शी म्हणाले, खासगी जीवनाबद्दल बोलताना गेट्स भावुक झाल्याचे दिसले. गेट्स यांनी संमेलनात ऑफ द रेकॉर्ड प्रश्नोत्तराच्या सत्रात वैयक्तिक जीवनाचा उलगडा केला. यात त्यांनी घटस्फोटापासून मेलिंडासोबतच्या नात्याबद्दलही मनमाेकळेपणाने उत्तरे दिली. या चर्चेत त्यांनी सीएनबीसीचे सूत्रसंचालक बेकी क्विक यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

परंतु कोणत्याही अफेअरचा उल्लेख केला नाही. गेट्सनी मेमध्ये मेलिंडा यांच्यापासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ते चौकशीच्या कक्षेत आले होते. त्यानंतर त्यांच्या अनेक अफेअरच्या बातम्याही प्रकाशात आल्या होत्या. त्यात गर्लफ्रेंड जेफ्री एपिस्टनशी त्यांचे असलेले संबंध व वर्षात एकवेळ गोपनीय सहलीचे किस्सेही समोर आले होते.

अफेअरच्या खुलाशानंतर पद सोडावे लागले
गेट्सबद्दल सर्वात आधी द डेली बीस्टने एक गौप्यस्फोट केला होता. घटस्फोटाच्या निर्णयाआधी गेट्स यांनी मॅनहटनमध्ये गर्लफ्रेंड जेफ्रीची भेट घेतली होती. त्यांनीच विभक्त होण्याचा सल्ला दिला होता. वॉल स्ट्रीट जर्नलच्या म्हणण्यानुसार अफेअरच्या बातम्यांनंतर मायक्रोसॉफ्ट बोर्डने गेट्स यांना पद सोडावे, असा सल्ला दिला होता.

बातम्या आणखी आहेत...