आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनच्या हेलाँगयांग प्रांतातील हार्बिन शहरात जगातील सर्वात माेठा ३९ वा आइस अँड स्नाे फेस्टिव्हल ५ जानेवारीपासून सुरू हाेत आहे. हा महाेत्सव एप्रिल २०२३ पर्यंत चालणार आहे. या मानवनिर्मित बर्फाच्या विश्वात बर्फापासून अनेक शिल्प तसेच विविध उपक्रम आयाेजित केले जातात. त्यात १०० हून जास्त हिम शिल्पे पाहायला मिळतील. पर्यटकांना येथे असलेल्या बर्फाच्या कलाकृती पाहण्याची संधी डिसेंबरपासून मिळाली. थंडीच्या या ऋतूमध्ये जगभरातील पर्यटक हार्बिनला भेट देतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही या महाेत्सवात अनेक चकीत करणारी शिल्प पाहायला मिळतील. येथील सर्वात माेठ्या कलाकृतीची उंची ९८० फूट एवढी आहे. बर्फाच्या कलाकृती िवतळू नयेत म्हणून त्यांना १० ते २५ अंश सेल्सियस तापमानात ठेवण्यात आले आहे. सुमारे ६ लाख चाैरस मीटर भागातील या स्नाे वर्ल्डमध्ये वेगवेगळे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
3 काेटी लाेक यंदा हार्बिन उत्सवात सहभागी हाेण्याची शक्यता 60 वर्षांपूर्वीची बर्फ संस्कृती व तिचे भविष्य अशी थीम.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.