आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान:कराचीमधील मंदिरात मूर्तींची तोडफोड, दुचाकीने आलेल्या हल्लेखोरांचा पुजाऱ्यांच्या घरावरही हल्ला

कराची22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर सुरू असलेले हल्ले सुरूच आहेत. तेथे पुन्हा एका मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. ही घटना कराचीतील आहे. बुधवारी दुचाकीने आलेल्या सहा ते आठ समाजकंटकांनी कोरांगी नंबर-५ भागातील श्री मरीमाता मंदिरात घुसून मूर्तींची तोडफोड केली. मंदिरातही तोडफोड करण्यात आली. मंदिराजवळ असलेल्या पुजाऱ्यांच्या घरांवरही हल्ला झाला.

काही दिवसांपूर्वीच या मंदिरात एका मूर्तीची स्थापना करण्यात आली होती, तिची स्थापना बांधकाम सुरू असलेल्या मंदिरात करण्यात येणार होती. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ६ ते ८ हल्लेखोर दुचाकीने आले होते. कोरांगीचे पोलिस अधिकारी फारूक संजरानी यांनी सांगितले की, आम्ही पुरावे जमा करत आहोत. हिंदूंची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू, शीख, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांना नेहमीच लक्ष्य केले जाते. मंदिर, गुरुद्वारा आणि चर्चवरही हल्ले होत आले आहेत. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये सिंध प्रांतातील कोटरीत ऐतिहासिक मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले होते.

कामगारांना दिल्या धमक्या
तक्रारकर्ते संजीवकुमार यांनी सांगितले की, दोन कामगार मंदिरांच्या आत भिंतींना रंग देत होते, तेव्हा काही संशयितांनी मूर्तीवर दगडफेक सुरू केली. कामगारांना धमक्या देऊन ते पळून गेले.

बातम्या आणखी आहेत...