आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • If A Child From A Low Income Class Befriends A Rich Person, He Will Be Hardworking In Life, Also Motivated To Earn Money | Marathi News

लाभदायी:कमी उत्पन्न वर्गातील मुलाची श्रीमंताशी मैत्री झाल्यास आयुष्यात तो कष्टाळू होईल, पैसा कमावण्याचीही प्रेरणा

वॉशिंग्टन5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कमी उत्पन्न गटातील एखाद्या मुलाने श्रीमंत वर्गातील मुलाशी मैत्री केल्यास तो भविष्यात स्वत:चा जीवनस्तर उंचावण्याची जास्त शक्यता असते. अशा मैत्रीला क्रॉस-क्लास फ्रेंडशिप असे म्हटले जाते. जपानची बॉवी मूळच्या गरीब कुटुंबातील आहेत. त्यांच्या आई-वडिलांकडे नोकरी किंवा घर असे काही नव्हते. परंतु त्यांचे शिक्षण उच्च वर्गातील मुले शिकत असलेल्या शाळेत झाले होते. त्यामुळे बावीची श्रीमंत वर्गातील मुलांशी मैत्री झाली. त्यातून प्रेरणा घेऊन पुढे त्या नामांकित वकील बनल्या. अलीकडेच सोशल मीडियातील २५ ते ४४ वयोगटातील ७.२ कोटी युजर्सची पाहणी झाली होती. त्यापैकी ८४ टक्के लोक अमेरिकन आहेत. कमी उत्पन्न गटातील मूल श्रीमंताच्या शेजारी राहत असल्यास तो आपल्या श्रीमंत मित्रासोबत खेळतो, जेवतो. त्यातून तो जास्त कमाई करण्यासाठी विशिष्ट मार्गाने वाटचाल करण्याची शक्यता २० टक्के वाढते. मैत्रीचा परिणाम माणसावर जास्त होतो. त्यामुळेच व्यक्ती मित्राच्या जीवनशैलीपासून लवकर प्रेरणा घेतात. आपल्याकडेही सर्व प्रकारच्या सुविधा असाव्यात. यासाठी ते कष्ट करतात. परंतु श्रीमंतांजवळ राहणे पुरेसे ठरत नाही. कारण विविध वर्गातील व्यक्तीसोबत मैत्री असल्यास खुलेपण वाढते. अशी मुले मोकळ्या स्वभावाची असतात. पाहणीतून उत्तरदाते कोठे राहत होते आणि कुणासोबत मैत्री आहे, हे पाहणीतून जाणून घेण्यात आले.

महाविद्यालयातून क्रॉस-क्लास फ्रेंडशिप वाढणे शक्य
दोन वेगवेगळ्या वर्गातील लोकांमध्ये मैत्री फुलण्याची सर्वात जास्त शक्यता महाविद्यालयीन जीवनात असते. मुलांना त्यांचे रूममेट निवडण्याचे स्वातंत्र्य नसावे. उलट प्रशासनाने ते निवडावेत. यातून आर्थिक विविधता, विविध संस्कृतीच्या मुलांमध्ये मैत्री होऊ शकते. त्यातच क्रीडा क्लबदेखील आपली भूमिका निभावू शकतात.

बातम्या आणखी आहेत...