आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्लाबोल केला. संयुक्त राष्ट्रात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या वक्तव्याचे स्मरण करून दिले. पाकिस्तानी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर जयशंकर म्हणाले, जगाची स्मरणशक्ती कमकुवत नाही. २०११ मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना हिलरी यांनी इशारा दिला होता. पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे टाळावे. आपल्या घरात साप पाळणाऱ्यांना तो शेजाऱ्यांना डसेल, असे वाटत असेल तर ते चुकीचे ठरेल, असे तेव्हा क्लिंटन यांनी म्हटले होते. जयशंकर पाकिस्तानी पत्रकारास म्हणाले, दक्षिण आशियातील दहशतवाद संपुष्टात येईल. त्याचे उत्तर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो जास्त चांगल्या प्रकारे देऊ शकतील. जगभरात भारताने सर्वाधिक सीमापार दहशतवादाची झळ सोसली आहे.
मोदींवरील टिप्पणी अशोभनीय
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केेलेल्या टिप्पणीवर परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला. प्रवक्ते म्हणाले, हे अशोभनीय वक्तव्य पाकिस्तानच्या निष्कृष्ट दर्जाहूनही खालच्या दर्जाचे आहे. बिलावल यांच्या वक्तव्याच्या विरोधात भाजप शनिवारी देशभरात निदर्शने करणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.