आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • If Caught In A Stampede.. If Caught In A Crowd, Keep Your Hands On Your Chest, Breathing Is Possible

दिव्‍य मराठी एक्‍सप्‍लेनर:चेंगराचेंगरीत अडकल्यास.. गर्दीत अडकल्यास हात छातीवर ठेवा, श्वास शक्य

सेऊलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊलमध्ये हॅलोविन पार्टीतील चेंगराचेंगरीत आतापर्यंत १५० जणांचा मृत्यू झाला. गर्दी अनियंत्रित झाल्यावर समुद्राच्या लाटांसारखी असते. त्यात अडकलेले लोक स्वत:च्या गतीवर नियंत्रण आणू शकत नाहीत. त्यातच कोणी पडले की आजूबाजूचेही पडतात. अशा स्थितीत अडकल्यावर काय करावे हे जाणून घेऊया

{गर्दीच्या गर्तेत अडकल्यावर काय करावे? गर्दीच्या गर्तेचा मुकाबला मुळीच करू नका. गर्दीच्या विरूद्ध दिशेनेही जाऊ नका. संतुलन ठेवून चाला. पडायचे नाही असा प्रयत्न करा. आपल्या हातांना बॉक्सरसारखे छातीवर ठेवा. त्यामुळे समोरील व्यक्तीपासून योग्य अंतर राखता येईल. श्वास घेता येऊ शकेल.

{पण गर्दीत पडल्यास काय करावे? गर्दीत पडल्यानंतर डाव्या बाजूने पडून राहा. त्यामुळे ह्रदय व फुफ्फुस सुरक्षित राहील. परंतु छाती किंवा पाठीवर झोपल्यास तुडवणाऱ्या लोकांच्या वजनाने छाती दबून जाऊ शकते. श्वास घेता येणार नाही.

{मित्र-नातेवाईक मागे राहिल्यास काय करावे? गर्दीत अडकल्यावर मदतीसाठी लगेच आरडाओरड करू नका. अशा ठिकाणी ऑक्सिजन कमी असतो. मोबाइल फोन पडल्यावर त्यास उचलण्याचा मुळीच प्रयत्न करू नका. कारण तो घेण्यासाठी वाकल्यास पुन्हा सरळ होता येणार नाही.

{अशा गर्दीतून बाहेर पडता येऊ शकते? गर्दीतून बाहेर पडण्यासाठी विरुद्ध दिशेने जाऊ नका. सोबत चालत-चालत अाडव्या रेषेतून गर्दीच्या किनारी पोहोचण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. गर्दीच्या शक्तीला आव्हान देण्याचाही प्रयत्न करू नका.

बातम्या आणखी आहेत...