आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआनंद चांगला न वाटणारे जगात अनेक लाेक असतात. त्यांच्यादृष्टीने आनंदाहून मूल्ये, उद्दिष्टांना (कठाेर परिश्रम, धर्म, नैतिकता, उत्कृष्टता, प्रतिष्ठा) जास्त महत्त्व असते. त्याही पलिकडे जाऊन काही लाेक आनंदाच्या मूल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आनंद अनावश्यक किंवा हानिकारक ठरू शकताे. अनेक देशांत आनंदातून भीती किंवा तिरस्काराच्या घटना घडल्याचा दावा एका अध्ययनातून समाेर आला आहे.
लाेक आनंदासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. प्रत्येक बाबतीत ते आनंदाला प्राधान्य देतात. आनंद शब्द उच्चारला तरी दु:खी हाेणारेही काही लाेक आहेत. बालपण खूप संघर्षात गेलेल्या लाेकांची अशी भावना असते. कारण यातून त्यांच्या मनात आनंदाबद्दलचा तिरस्कार दिसून येताे. या अध्ययनात ८७१ जणांचा समावेश हाेता.
दीर्घकालीन परिणाम, वर्तमानात एकटेपणा संशाेधक जाेशनूल म्हणाले, लहानपणी वेदनादायी अनुभव घेणाऱ्या व्यक्तीच्या मनात सुखाच्या बाबतीत दीर्घकाळ वेगळी भावना राहू शकते. वयस्कर झाल्यानंतरही ताे प्रभाव दिसू शकताे. अशी व्यक्ती एकलकाेंडेपणा अनुभवते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.