आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • If Cough, Itchy Eyes, Sneezing Problem Is Present For A Long Time, It Is Allergy; Symptoms Should Be Monitored

दिव्य मराठी विशेष:खोकला, डोळ्यांना खाज, शिंकांचा त्रास बराच काळ असेल, तर ती ॲलर्जी; लक्षणांवर नजर ठेवणे आवश्यक

वॉशिंग्टन20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर डोळ्यांना खाज, नेत्रविकार, शिंका येणे, थकवा, पुरळ उठणे, घसा खवखवणे आणि वारंवार शिंका येणे असा त्रास होत असेल आणि महिना उलटूनही ही समस्या दूर झाली नसेल तर तुम्ही एकटे नाही आहात. बदलत्या ऋतूमुळे शेकडो लोक या अॅलर्जीचा सामना करत आहेत. अमेरिकेत या वर्षी वसंत ऋतू लवकर आला, परागकण लवकर झाले. त्यामुळे जास्त त्रास आहे. अॅलर्जी आणि इम्युनोलॉजी तज्ज्ञ डॉ. क्रिस्टीन वंजचारोनकर्ण म्हणतात,‘परिस्थिती लवकर ठीक होणार नाही. अलीकडील ट्रेंड दर्शवते की हंगामी अॅलर्जी दीर्घ आणि त्रासदायक होत आहे. गरज आहे ती स्वत:ला अशा अॅलर्जीसाठी तयार करण्याची. जाणून घ्या कसे...

तयारीने बाहेर पडा : सकाळी परागकणांचे प्रमाण सर्वाधिक असते. ओक्लाहोमा अॅलर्जी क्लिनिकच्या डॉ. लॉरा चोंग सांगतात,‘जर तुम्हाला महत्त्वाच्या कामासाठी जायचे असेल तर एन-९५ मास्क वापरा.

स्वच्छता आवश्यक: बाहेरून आल्याननंतर अंघोळ करणे आवश्यक आहे. पाळीव प्राण्यांबरोबर झोपू नका. याशिवाय एसी फिल्टर्स साफ करत राहा, वेळेवर बदला.

औषधे घ्या : त्रास कमी असेल तर बिना प्रिस्क्रिप्शनची औषधे परिणामकारक होऊ शकतात. समस्या वाढल्यास अॅलर्जी तज्ज्ञाला दाखवा. इरविंग मेडिकल सेंटरचे डॉ. फिलिप मस्किन म्हणतात, “लक्षणे आणि त्यांचा कालावधी याकडे लक्ष द्या. उदाहरणार्थ, तुम्ही कमी झोपत आहात किंवा तुम्ही ज्या गोष्टींचा आनंद लुटता त्यामध्ये रस कमी झाला आहे? असं कधीपासून वाटतंय? अॅलर्जी हलक्यात घेऊ नका, वेळेवर उपचार न केल्यास समस्या गुंतागुंतीची होऊ शकते. इम्युनोथेरपी आणि अॅलर्जी शॉट्स: तज्ज्ञ म्हणतात, ‘औषधांनी काही फरक पडत नसेल, तर इम्युनोथेरपी किंवा अॅलर्जी शॉट्सचा पर्याय आहे. या उपचारात रुग्णांना अशी इंजेक्शन्स दिली जातात ज्यात त्यांच्यातील अॅलर्जीन कमी प्रमाणात असते.

औषधांसोबत नेझल स्प्रे, आय ड्रॉप, इन्हेलरने लवकर आराम मिळेल
डॉ. क्रिस्टीन सुचवतात, “अॅलर्जी बऱ्याचदा त्रासदायक असते, त्यामुळे अॅलर्जीची लक्षणे दिसताच औषध सुरू करा. जर औषध सुरुवातीला घेतले नाही तर उपचार आठवडे किंवा महिनोन‌्महिने चालू शकतात. यूसीएसएफ हेल्थमधील इम्युनोलॉजिस्ट डॉ. मिशेल फाम म्हणतात, “लक्षणे दिसू लागल्यानंतर, आवश्यक औषधांव्यतिरिक्त अन्य उपचार आवश्यक असू शकतात. विशिष्ट लक्षणांवर अवलंबून, नेझल स्प्रे, आय ड्रॉप, इन्हेलर वा स्किन क्रीमनेे उपचार केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.