आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा सामना:भारत, चीनमध्ये चाचण्या वाढल्या तर आमच्यापेक्षा जास्त रुग्ण : ट्रम्प

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
छायाचित्र अमेरिकेच्या गुइलफोर्डच्या कारखान्याचे आहे. येथे ट्रम्प यांनी मेडिकल स्वॅबची पाहणी केली.
  • राष्ट्राध्यक्ष म्हणाले, आम्ही जास्त चाचण्या केल्या
  • कंपन्यांच्या सहकार्याने अमेरिकेची तपासणी क्षमता वाढल्याचा दावा
Advertisement
Advertisement

भारत आणि चीनसारख्या देशांनी जर जास्त चाचण्या केल्या तर त्यांच्या येथे कोरोनाचे रुग्ण अमेरिकेपेक्षा जास्त असतील, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी प्युरिटन मेडिकल प्रॉडक्ट्सच्या कार्यक्रमात सांगितले की, अमेरिकेने २ कोटी चाचण्या केल्या आहेत. जास्त चाचण्या करतील तर जास्त रुग्ण आढळतील, हे लक्षात ठेवा. प्युरिटन मेडिकल स्वॅब बनवणारी कंपनी आहे. हे स्वॅब त्वरित तपासणीसाठी महत्त्वाचे आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, प्युरिटनसारख्या कंपन्यांमुळे अमेरिकेत तपासणीची क्षमता वाढली. आता अमेरिकेची अर्थव्यवस्था सुरळीत होत आहे. आम्ही शक्यता वास्तवात उतरू दिली नाही. सरकारने कोरोनाला हरवण्यासाठी आपली आणि अमेरिकी उद्योगाची पूर्ण ताकद लावली आहे. कोरोना नावाचा अदृश्य शत्रू चीनमधून आला होता. चीनमध्येच तो थांबवता आला असता, मात्र त्यांनी तसे केले नाही.

अमेरिकेत कोरोनाचे सुमारे १९६६२६६ रुग्ण आहेत. तर, १११३९८ मृत्यू झाले आहेत. येथे २०२७०३२५ चाचण्या केल्या आहेत. भारतात २३६१८४ रुग्ण असून ६६५० मृत्यू झाले आहेत. भारतात ४५२४३१७ चाचण्या केल्या आहेत. चीनमध्ये ८४१७७ रुग्ण आढळले आहेत, तर ४६३४ मृत्यू झाले आहेत. चीनने एकट्या वुहानमध्ये एक कोटीपेक्षा जास्त चाचण्या केल्याचा दावा केला आहे. इतर भागातील चाचणीचे आकडे अपडेट केलेले नाहीत.

संसर्ग : न्यूयॉर्कमध्ये मृत्यू कमी, टेक्सासमध्ये दिवसभरात जास्त रुग्ण

अमेरिकेत कोरोना केंद्र असलेल्या न्यूयॉर्क राज्यात २४ तासांत ४२ मृत्यू झाले. गव्हर्नर अँड्र्यू क्युमो यांनी सांगितले की, मार्चपासून या राज्यात कोरोनामुळे मृत्यूंचा सर्वात कमी आकडा आहे. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत ३९६६९९ प्रकरणे आहेत. तर, ३०३७२ मृत्यू झाले आहेत. तिकडे टेक्सासमध्ये २४ तासांत २०८० रुग्ण आढळले आहेत. हा एक दिवसात राज्यातील संसर्गाचा सर्वाधिक आकडा आहे. टेक्सासमध्ये आतापर्यंत ७३२८६ रुग्ण आढळले आहेत. तर, १८२८ मृत्यू झाले आहेत.

सवलत : अमेरिकेची चिनी विमान कंपन्यांना मर्यादित उड्डाणांना मंजुरी

ट्रम्प प्रशासनाने सांगितले की, ते चिनी विमान कंपन्यांना अमेरिकेसाठी मर्यादित संख्येत उड्डाणे करण्याची परवानगी देतील. त्यांच्यावर पूर्णपणे प्रतिबंध लावणार नाहीत. चिनी विमान कंपन्या अमेरिका आणि चीन दरम्यान दर आठवड्याला ४ उड्डाणे संचालित करू शकतील. याआधी गुरुवारी चीनने प्रतिबंध कमी करणे आणि विदेशी विमान कंपन्यांच्या अधिक उड्डाणांना परवानगी देण्याची तयारी दर्शवली होती. चीनमधील प्रतिबंधामुळे अमेरिकी कंपन्या युनायटेड आणि डेल्टा यांना दोन्ही देशांमध्ये उड्डाणे करण्यास रोखले होते.

Advertisement
0